कामगारांसाठी मध्यान्न भोजन योजना जिल्ह्यात सगळीकडे सुरू करा !

प्राजक्त चव्हाण याचे जि प सीईओ यांना निवेदन

प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यान्ह भोजन योजना चालू करण्यात आली आहे. हे योजना चालू करण्यासाठी कामगार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी कामगार मंत्री .सुरेश खाडे यांचे लक्ष डिसेंबर मध्ये वेधले होते.. हि योजना सगळीकडे सुरु व्हावी यासाठी प्राजक्त चव्हाण यांनी सोमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांची भेट घेऊन सदर योजना ग्रामपंचायत स्तरावर अधिक जलदगतीने कार्यान्वित करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
बांधकाम कामगार व इतर कामगार यांच्या साठी शासनाने मध्यान्ह भोजन योजना संपूर्ण महाराष्ट्र मध्ये चालू केली होती. सदर योजने अंतर्गत सर्व प्रकारच्या कामगार यांना मोफत असे दोन वेळचे जेवण पुरविण्याचे काम कंपनीला देऊन कामगार यांना आपल्या गावामधे सदर जेवण पुरविण्याचे काम कंपनी मार्फत करण्यात येते. मध्यान्ह भोजन योजना संपूर्ण महाराष्ट्र मध्ये चालू होती परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात सदर योजना चालू करण्यात आली नव्हती. बहुसंख्य कामगार यांनी ही व्यथा कामगार अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांच्या कडे मांडली. सदर विषयी लक्ष घालून कामगार अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी तात्काळ मुंबई मंत्रालय येथे जाऊन कामगार मंत्री सुरेश खाडे यांची भेट घेऊन सदर योजनेसाठी विशेष लक्ष देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यान्ह भोजन योजना कार्यान्वित करण्याची विनंती केली होती.
पुढील काही दिवसात टेंडर प्रोसेस होऊन इंडो कंपनीला सदर टेंडर देऊन मार्च महिन्यात सिंधुदुर्ग मधे सर्व नोंदणीकृत कामगार व जे कामगार नोंदणी कृत नाही अश्या सर्व प्रकारच्या कामगार वर्गासाठी ही योजना सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आली.
आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ग्रामपंचायत मार्फत मध्यान्ह भोजन योजना चालू करण्यात आली आहे. परंतु काही ग्रामपंचायत व कामगार माहिती नसल्याने सदर योजना चालू करण्यासाठी कार्यवाही करण्यात आली नाही. याच अनुषंगाने आज मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांची भेट घेऊन सदर योजना ग्रामपंचायत स्तरावर अधिक जलदगतीने कार्यान्वित करण्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राजक्त चव्हाण, कामगार संघटना सहसचिव अंकुश चव्हाण, मध्यान्ह भोजन कंपनीचे प्रतिनिधी व मालवण तालुका अध्यक्ष भूषण पाताडे उपस्थित होते.
नोंदणीकृत कामगार व जे कामगार नोंदणीकृत नाही अश्या सर्व कामगार वर्गानी या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे. तसेच जे नोंदणीकृत कामगार नाही आहेत त्यांनी श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांच्याशी संपर्क साधून आपली कामगार नोंदणी करायची आहे असे आवाहन करण्यात येत आहे.
संघटनेच्या अधिकृत कुडाळ ओरोस व कणकवली येथील ऑफिस मध्ये जाऊन नोंदणी करायची आहे. अधिक माहितीसाठी अध्यक्ष प्राजक्त चव्हाण 9028390839 यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.

error: Content is protected !!