श्री साई मंदिर तारकर्लीचा 14 एप्रिल पासून वर्धापन दिन महोत्सव
मालवण : तारकर्ली ग्राम श्रीसाई मंडळ मुंबई ,श्री साई मंदिर तारकर्ली यांच्यावतीने मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्ष आणि साई मंदिरचा तेरावा वर्धापनदिनानिमित्त दिनांक १४ एप्रिल ते १८ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवित आहे.त्यात दिनांक १६/४/२०२३ रोजी रात्री ठीक ९:०० वाजता मालवण तालुक्यातील दिंडी भक्तांना दिंडी स्वरूपात आपली कलाकृती दाखविण्याकरिता दिंडी स्पर्धा आयोजित केली आहे. त्यांचं पहिले बक्षीस रुपये ७०००/,दुसरे बक्षीस रुपये ५०००/, तिसरे बक्षीस रुपये ३०००/ अशी असून दोन उत्तेजनार्थ स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहेत.तरी आपली नावे १२/०४/२०२३ पर्यंत देवांग तारी ९१५६६३८७७९, प्रसाद बापर्डेकर ८०९७६८५५०७ यांच्याजवळ देणे.असे आवाहन मंडळाचे कार्याध्यक्ष सुरेश बापर्डेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.