जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे चे नेत्र दीपक यश

कणकवली/मयूर ठाकूर
सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा अंतर्गत बुद्धिबळ स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडे या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले आहे या स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलांच्या गटात सुश्रुत नानल (इयत्ता दहावी) याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला तर याच गटात यश पवार (इयत्ता नववी )याने पाचवा क्रमांक प्राप्त केला ,14 वर्षाखालील मुलांच्या गटात गौरेश तायशेटे याने तिसरा क्रमांक पटकावला.
दर्जेदार खेळाचे प्रदर्शन व जिद्द या जोरावर विद्यार्थ्यांनी हे यश प्राप्त केले असून या सर्व विद्यार्थ्यांची विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या नेत्रदीपक यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे,उपाध्यक्ष श्री मोहन सावंत,कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल,सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे,सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ. शितल सावंत मॅडम, सल्लागार डी.पी तानावडे सर, मुख्याध्यापिका सौ. अर्चना शेखर देसाई शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.





