आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे मध्ये पर्यावरण पूरक उपक्रम

“टाकाऊ पासून टिकाऊ चा सुंदर संदेश”
कणकवली/मयूर ठाकूर
उत्सव साजरा करूया आनंदाने पण निसर्ग जपूया प्रेमाने! या विचारातून ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी यंदाच्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक आगळावेगळा सृजनशील आणि पर्यावरण पूरक उपक्रम राबवून सर्वांसमोर नवा आदर्श ठेवला आहे या उपक्रमांतर्गत प्रशालेतील विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवातील निर्माल्यापासून सुगंधी धूप कांड्या तयार केल्या तर ज्युनिअर के.जी व सीनियर के.जी च्या चिमुकल्याने माती पासून सुंदर दिवे घडवले.
टाकाऊ पासून टिकाऊ ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीत आणून विद्यार्थ्यांनी संरक्षणाचा सुंदर संदेश समाजाला दिला.
धूपकांडी तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवात जमा झालेली फुले पाने, निर्माल्य इत्यादी वाळहून त्यात गंधद्रव्य, कापूर व इतर नैसर्गिक पदार्थ मिसळून त्यांनी पर्यावरणात अनुकूल अशा धुपकांड्या बनवल्या व त्याचे वाटप समाजातील नागरिकांना करत स्वच्छता, व पर्यावरण जपवणुकीचा संदेश दिला.
या उपक्रमाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे,उपाध्यक्ष श्री मोहन सावंत,कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल,सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे,सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ. शितल सावंत मॅडम, सल्लागार डी.पी तानावडे सर, मुख्याध्यापिका सौ. अर्चना शेखर देसाई शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.





