राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर 5 येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच वृक्षभेट.

शालेय विद्यार्थ्यांनी केक कापून केला वाढदिवस साजरा.

राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर यांच्या मार्फत जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

कणकवली/प्रतिनिधी

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचा वाढदिवस संपूर्ण जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जात आहे.राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रमांच आयोजन केल असून कणकवली येथे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर पाच येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करून युवक जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर तसेच त्यांच्या सहकऱ्यांनी वाढदिवस साजरा केला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी केक कापून अबिद नाईक यांना शुभेच्छा दिल्या. शाळा नंबर पाच येथे वाढदिवसानिमित्त वृक्षवाटप देखील करण्यात आले.
कणकवली नगर वाचनालय येथे विविध पुस्तकांचे वाटप,कणकवली उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप तसेच तसेच शाळा नंबर पाच येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप,दिवीजा रुग्णालयात अन्न धान्याचे वाटप,समाजातील गरजूंना विविध अन्नधान्याच्या किटचे वाटप अश्या विविध सामाजिक उपक्रमांच आयोजन वाढदिवसानिमित्त करण्यात आले आहे.

error: Content is protected !!