राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचा वाढदिवस दिवीज्या वृद्धाश्रमात केक कापून साजरा.

वाढदिवसानिमित्त अन्नधान्याचे वाटप.

आजी आजोबांच्या चेहऱ्यावरचं हास्य हेच आमचे खरे समाधान – युवक जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर

कणकवली/मयूर ठाकूर.

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन युवक जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर व सहकाऱ्यांच्या वतीने करण्यात आल आहे.अबीद नाईक यांचा वाढदिवस नुकताच दिवीजा वृद्धाश्रमात केक कापून साजरा करण्यात आला.प्रसंगी अन्नधान्याचे वाटप देखील वाढदिवसानिमित्त करण्यात आले.
अबिद नाईक यांच्या माध्यमातून वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.हाच आदर्श घेत कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांच आयोजन केल आहे.कणकवली नगर वाचनालय येथे विविध पुस्तकांचे वाटप,कणकवली उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप तसेच तसेच शाळा नंबर पाच येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप,समाजातील गरजूंना विविध अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात येणार आहे.दिवीज्या वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा करून विशेष समाधान मिळाले.असेच विविध उपक्रम दिवसभरात राबवले जाणार असल्याची माहिती युवक अध्यक्ष निशिकांत कडुलकर यांनी दिली. प्रसंगी राष्ट्रवादी युवक चे सर्व पदाधिकारी आणि अबिद नाईक यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!