बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांचे दिवाळीभेट वस्तू प्रदर्शन

कुडाळ दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या विविध विभागातील विद्यार्थ्यांतर्फे दिवाळी गृहपयोगी वस्तू व खाद्य पदार्थ यांचे नुकतंच प्रदर्शन भरवण्यात आले.
संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, संस्था सीईओ अमृता गाळवणकर, सेंट्रल स्कूलच्या प्राचार्या चैताली बांदेकर, नर्सिंग कॉलेज च्या प्राचार्य कल्पना भंडारी व इतर शिक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
दरवर्षी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध शोभेच्या वस्तू तसेच विविध खाद्यपदार्थ यांचे प्रदर्शन बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या विविध विभागांचा सहभाग असलेलं प्रदर्शन विद्यार्थ्यांमार्फत भरविले जाते. याही वर्षी वसुबारस दिनाचे औचित्य साधून विविध उपयोगी शोभेच्या वस्तू, फ़राळ, रुचकर खाद्यपदार्थ यांचा समावेश असलेल प्रदर्शन विद्यार्थ्यांतर्फे भरविले गेले. विद्यार्थ्यांतील कलागुणाला व त्यांच्या अन्नपूर्णतेच्या कौशल्याला वाव देण्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांतर्फे ही दिवाळी जत्रा भरवली जाते. विद्यार्थी हे मोठ्या उत्साहाने हिरीरीने या प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवतात आणि त्याचा आनंद घेत असतात. आणि यातून आपलं पाक कौशल्य व विक्रय कौशल्य सुद्धा दाखवत असतात.याही वर्षी बहुसंख्येने विद्यार्थ्यांनी या दिवाळी पदार्थांच्या प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवून या प्रदर्शनाचा आनंद दिला घेतला.
उपस्थित पालकांनी सुद्धा दिवाळी प्रदर्शनाच्या या कार्यक्रमाच्या, सोहळ्याच्या आयोजनाबद्दल संस्थाचालक, सेंट्रल स्कूल व इतर सहभागी शिक्षकांचे आभार व्यक्त केले व सक्रिय सहभाग नोंदवत या सोहळ्याला उत्स्फूर्तपणे दाद दिली.
विद्यार्थ्यांतील कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने या अनोख्या प्रदर्शनाचे आयोजन केल्याबद्दल संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांनी पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत, कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!