झाराप जीवदानच्या आकर्षक शुभेच्छा पत्राना दिवाळीत मोठी मागणी

झाराप जीवदान विशेष शाळा मतिमंद मुलांच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या या संस्थेच्या मुलांनी खास दिवाळीसाठी आकर्षक शुभेच्छापत्रे तयार केली आहेत. परिसरातून यांना मोठी मागणी आहे.
तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या दीपोत्सवात जीवदान शाळेच्या मुलांनी मेहनतीने आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दिवाळीसाठी लागणारी शुभेच्छापत्रे, आकाश कंदील, पणत्या, विविध प्रकारचे साबण, फराळ अशा वस्तू तयार केल्या आहेत. सतत एक पाऊल पुढे राहण्यासांठी आणि मुलांच्या जिद्दीला जागृत ठेवण्यासाठी झाराप जीवदान संस्था प्रयत्न करीत आहे. या संस्थेला शासनाकडून कोणतेही अनुदान मिळत नसून केवळ समाजातील संवेदनशील नागरिकांच्या सहकार्याने हे काम चालत असते या मुलांना संचालक फादर जॉर्ज, उपसंचालक फादर अन्टोनी, मुख्याध्यापका सिस्टर रोजम्मा, जॉब परिचारिका कोच्युट्रोसिया, विशेष शिक्षिका, लिसीन, स्नेहा परब, तनया मोरजकर, रश्मी रेडकर, इशा सूर्याजी, हेमंत साळुंखे, भिवाजी आकेरकर ,हरीश नलावडे गौरव जाधव, एमएसडब्ल्यूच्या शिक्षिका पूनम गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.





