सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचा निकाल होणार ३ एप्रिल रोजी जाहीर

जिल्ह्यातून ७५४२ विद्यार्थी प्रविष्ठ
असा पाहता येणार ऑनलाईन निकाल
युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ- सांगवे आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रत्नांचा शोध घेणारी सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) 2023 परीक्षेचा निकाल सोमवार दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी दुपारी तीन वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
यावर्षी युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ- सांगवे आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) 2023 परीक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ परीक्षा केंद्रावर घेण्यात आली होती.२री ३री, ५वी, ६वी व ७वी घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी जिल्हा भरातून ७५४२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.
युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या यांच्या ३ एप्रिल या वाढदिवसा दिवशी दुपारी ठिक 3.00 वा Online result जाहीर करण्यात येइल. युवा संदेश प्रतिष्ठानच्या https://bit.ly/stsresults2023 या लिंक वर विद्यार्थ्याचा बैठक क्रमांक लिहून सर्वांना निकाल पाहता येईल.
या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख अडीज लाख रुपयांची बक्षिसे, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे तसेच ६वी व ७ वी मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना लॅपटॉप बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे. यावर्षी उत्तरपत्रिका OMR पद्धतीची असल्याने संगणकाद्वारे तपासण्यात आल्या असून निकाला दिवशी पालक/शिक्षक/विद्यार्थी यांना निकाल व सोडवलेली उत्तरपत्रिका ऑनलाईन पाहता येणार आहे.
अधिक माहितीसाठी STS परीक्षा प्रमुख श्री. सुशांत सुभाष मर्गज(९४२०२०६३२६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठाचे संस्थापक अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आणि संजना संदेश सावंत माजी जि प अध्यक्ष यांनी केले आहे.
दिगंबर वालावलकर कणकवली