कणकवली शहरात “त्या” प्रकरणावरून “फ्री स्टाईल”

आज दुपारची विद्यार्थ्यांसमोरची घटना

पोलिसात नोंद नाही मात्र चर्चा जोरात

कणकवली : कणकवलीतील विद्यादानाचे कार्य करणाऱ्या एका संस्थेतील ज्ञानदान करणाऱ्या एका गुरुवर पालकाने घुसून फ्री स्टाईल राडा केल्याची घटना आज कणकवलीत दुपारी घडली. त्या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांसमोरच घडलेल्या या प्रकाराने एकच गोंधळ उडाला. मात्र या घटनेची पोलिसात नोंद नव्हती. उपलब्ध माहितीनुसार शहरात घटना घडली त्या ठिकाणी काम करत असलेल्या त्या ज्ञानदान करणाऱ्या गुरुने शहरा नजीकच्या गावातील असलेल्या पालकाच्या मुला संदर्भात केलेल्या घटनेनंतर त्या रागातून हा प्रकार घडल्याचे समजते. दुपारी त्या पालकाने त्या ठिकाणी घुसून विद्यार्थ्यांसमोरच राडा केला. या झालेल्या फ्री स्टाइल मुळे त्या आवारात एकच गोंधळ उडाला होता. दरम्यान यानंतर त्या कंत्राटी असलेल्या प्राध्यापकाने पोलिसात देखील धाव घेतल्याचे समजते. मात्र याप्रकरणी पोलिसात नोंद नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र या घटनेची चर्चा कणकवली शहरासह आसपासच्या गावात सुरू होती.

दिगंबर वालावलकर / कणकवली

error: Content is protected !!