खारेपाटण पं. स. साठी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेमधून महेश कोळसुलकर इच्छुक

खारेपाटण व तळेरे पंचायत समिती मतदार संघ सदस्य पदाचे आरक्षण सर्वसाधारण

येणाऱ्या खारेपाटण पं. स. व जि. प सदस्य पदाच्या निवडणुकी साठी खारेपाटण-तळेरे विभागात इच्छुक उमेदवारांची चढाओढ आपल्याला पाहायला मिळतं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून सोमवारी जाहीर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आरक्षणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिशय महत्वाचा समजला जाणारा खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघात मोडणारे खारेपाटण व तळेरे हे दोन पंचायत समिती मतदार संघ सर्वधारण म्हणून जाहीर झाले आहेत. खारेपाटण पं. स. मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेने मधून महेश कोळसूलकर यांनी निवडणुक रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली असून येणाऱ्या पं स निवडणुक रिंगणात पूर्ण ताकदिने निवडणुक लढवणार असल्याने स्पष्ट केले आहे.आरक्षणामुळे नव्याने उभ्या राहणाऱ्या उमेदवारांना एक प्रकारची संधी चालून आली असल्यामुळे निवडणुकीत विजय मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु करण्यात येत आहेत. यासाठी सर्वच उमेदवारांची धडपड सुरू आहे.मात्र निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची असणारी भूमिका तसेच युती आणि आघाडी यांची मोर्चेबांधणी याचा सुद्धा उमेदवारी निवडीवर परिणाम होणार आहे.
खारेपाटण पंचायत समिती मतदार संघ सर्वधारण झाल्याने इथे सगळ्याच राजकीय पक्षांचे उमेदवार उभे राहण्यास इच्छुक असून अपक्ष उमेदवार देखील निवडणुकीत उभे राहण्याची दाट शक्यता त्यामुळे आता पासूनच सर्वपक्षीय कार्यकर्ते कामाला लागले असल्याचे समजते.
सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली असून उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली असून युती आणि आघाडीच्या खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातील व पंचायत समिती मतदार संघातील उमेदवारीचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.

error: Content is protected !!