कुडाळ-मालवण मतदारसंघात ४ एप्रिल रोजी सावरकर गौरव यात्रा

भाजप नेते निलेश राणे करणार नेतृत्व

कुडाळ : स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव रॅली यात्रा ४ एप्रिल २०२३ रोजी कुडाळ-मालवण मतदारसंघात भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते तसेच पदाधिकारी सहभागी होणार आहेत. राज्यात १ एप्रिल ते ६ एप्रिल २०२३ प्रत्रेक जिल्ह्यात, प्रत्येक मतदारसंघात आणि प्रत्येक प्रत्येक मतदारसंघात या यात्रेचे आयोजन केले आहे, अशी माहिती आज कुडाळ येथील पत्रकार परिषदेत भाजप नेते निलेश राणे यांनी दिली. भाजपतर्फे ४ एप्रिल रोजी कुडाळ-मालवण मतदारसंघात गौरव रॅली होईल. याचे नेतृत्व भाजप नेते निलेश राणे आणि कणकवलीत मतदारसंघात आमदार नितेश राणे नेतृत्व करणार आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे देशासाठी योगदान कोणीच विसरू शकत नाही. काँग्रेस पक्ष सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा द्वेष करतो. अशा महापुरुषाला राहुल गांधी ज्या भाषेत बोलतात की, ‘मी स्वातंत्र्यवीर सावरकर नाही’. ! खरे तर राहुल गांधी केव्हाच सावरकर होऊ शकत नाहीत. त्यांची तेवढी पात्रता सुद्धा नाही. सावरकरांनी जीवनात काय केले हे समजण्याएवढी अक्कल राहुल गांधी यांच्यामध्ये नाही. मी जवळून राहुल गांधी यांच्याबरोबर काम केले आहे. राहुल गांधी यांची अक्कलेची उंची मला चांगली माहिती आहे, अशी टीका भाजप नेते निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केली. महाराष्ट्रात सावरकरांचे महत्त्व काय आहे हे दाखवण्यासाठी सिंधुदुर्गात ३, ४, ५ एप्रिल २०२३ रोजी सावरकर गौरव यात्रा काढणार आहोत, अशी माहिती निलेश राणे यांनी दिली.
यावेळी निलेश राणे यांनी संजय राऊतला मारायची गरज काय ? स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी ही सगळी थेरं संजय राऊत करत असतो. त्याने एवढा काय मोठा पराक्रम गाजवलेला नाहीय, अशी टीका भाजप नेते निलेश राणे यांनी करत असतानाच तुम्ही एवढं काय महत्त्व देता असा प्रश्नही माध्यमांना विचारला.
तर याच मुद्द्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला मागितला आहे. यावर संजय राऊत यांना मिळालेल्या धमकीचा तपास सुप्रिया सुळे यांनी केला आहे का ? असा काही रिपोर्ट सुप्रिया सुळे असल्यास त्यांनी तो सरकारकडे द्यावा असा सल्लाही त्यांनी यावेळी सुप्रिया सुळे यांना दिला.

रोहन नाईक, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!