कणकवली नगरपंचायत च्या आरक्षण सोडतीमध्ये दिग्गजांना धक्का

काहींना पुन्हा संधी, तर काहींना वेगळ्या प्रभागांमध्ये लढावे लागणार

प्रांताधिकारी जगदीश कातकर, मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आरक्षण सोडत

कणकवली नगरपंचायतीची आरक्षण सोडत आज जाहीर झाली असून, कणकवली नगरपंचायत च्या 17 प्रभागांसाठी नगरसेवक या पदाकरता प्रांताधिकारी जगदीश कातकर व मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 1 साठी सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 2 साठी सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 3 साठी सर्व साधारण, प्रभाग क्रमांक 4 साठी नामाप्र महिला, प्रभाग क्रमांक 5 नामाप्र महिला, प्रभाग क्रमांक 6 साठी सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 7 साठी नामाप्र महिला, प्रभाग क्रमांक 8 साठी अनुसूचित जाती, प्रभाग क्रमांक 9 साठी सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक 10 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 11 साठी अनुसूचित जाती महिला, प्रभाग क्रमांक 12 साठी सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक १३ साठी नामाप्र, प्रभाग क्रमांक 14 साठी नामाप्र, प्रभाग क्रमांक 15 साठी सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 16 साठी सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 17 साठी सर्वसाधारण अशी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अनेक दिग्दजाना धक्का बसला असून काही ना पुन्हा संधी मिळाली आहे. तर एकूणच या निवडणुकीचे पडघम वाजायला आता सुरुवात झाली असून आरक्षण सोडती मुळे धक्का बसलेल्या इच्छुकांना आता वेगळ्या प्रभागा मध्ये जुळवा जुळव करावी लागणार आहे. त्यामुळे या आरक्षण सोडती वेळी काहींचे चेहरे आनंदी तर काहींच्या चेहऱ्यावर नाराजीचे वातावरण दिसत होते. माझी नगरसेवकां सहित अनेक राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची देखील उपस्थित होते.

error: Content is protected !!