फार्मर आयडी नोंदणी कृषि मेळाव्याला झाराप मधे उत्स्फूर्त प्रतिसाद

शेतकऱ्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी झाराप ग्रामपंचायत सातत्याने प्रयत्न करत आहे. तंत्रज्ञानाचा वापर कृषी क्षेत्रामध्ये करता यावा म्हणून डीजीटल क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकरी मित्रानो, ह्याचे अनेक फायदे आहेत. योजनेचा लाभ पिक विमा, अनुदान ह्या सारख्याबाबी मध्ये शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये व लाभार्थी शेतकऱ्याला त्याचा लाभ फसवणूक न होता त्याच्या पर्यंत पोहचवणे हे ह्या कृषी शेत्रातील डीजीटल क्रांती घडवून आणण्याचा प्रमुख उद्देश आहे, असे मत झाराप सरपंच दक्षता मेस्त्री यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत झाराप ग्रामपंचयातने शनिवारी झाराप येथील सभागृहात मोफत फार्मर आयडी कृषी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना मेस्त्री बोलत होत्या.
हरितक्रांतिचे जनक कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलनाने मेळव्याचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषिपर्यवेक्षक मंदार सरंबळकर होते. कृषि सहायक जागृती कुरतड़कर, ग्रामसेवक भूषण बालम, प्रगतशील शेतकरी शरद धुरी, सखाराम घाडी, विष्णु माणगावकर व शेतकरी उपस्थित होते.
कामत कृषि सेवा केंद्रचे प्रणव कामत यांनी शेतकऱ्यांचे फार्मर आयडी ऑनलाइन काढले. शेतकऱ्यांनी घेतलेल्या योजनाचा लाभ किंवा योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या अडचणींना समोर जावे लागणार नाही ह्या साठी केंद्र सरकार एक डीजीटल डेटाबेस तयार करते आहे. शेतकरी वर्गाचे सातत्याने होणाऱ्या फसवणुकीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी सरकार हा उपक्रम राबवीत आहे. ज्याचा फायदा वेगवेगळ्या सरकारी योजनामध्ये, पिक विमा व शेतकऱ्याला मिळणारी आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यासाठी एक विशिष्ट पोर्टल केंद्र सरकार तयार करत आहे. ज्याचे नाव ऑग्री स्टॅक पोर्टल असे आहे.
सध्या परिस्थिती बघता आता ह्या पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारच्या नवीन निर्देशनुसार प्रत्येक शेतकऱ्याला आपले Farmer ID तयार करणे बंधनकारक केले आहे. कुठल्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याच बरोबर पीक विमाचा लाभ घेण्यासाठी Farmer ID Registration अनिवार्य करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती मध्ये दुष्काळ, वादळ किंवा अतिवृष्टी, गारपीट आणि इतर सर्वच नैसर्गिक बाबीचा समावेश करण्यात आला अशी माहिती कृषि पर्यवेक्षक मंदार सरंबळकर यांनी शेतकऱ्यांना दिली. आभार ग्रामसेवक भूषण बालम यांनी मानले.

error: Content is protected !!