सिंधुदुर्ग जिल्हा लिजेंड क्रिकेटर्स जपणार खेळासोबत सामाजिक बांधिलकी

ओरोस येथे कार्यकारिणीची सभा संपन्न

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा लिजेंड क्रिकेटर्स कार्यकारिणीची सभा पी.एफ. डॉन्टस सभागृह ओरोस येथे दिपक भोजने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ह्या सभेत क्रिकेट बाबतीत काय करता येईल, सामाजिक बांधिलकी कशाप्रकारे पार पाडता येईल तसेच आपल्या लिजेंड सदस्यांना कसा आनंद देता येईल याबाबतच विचार विनिमय झाला.
अध्यक्ष दिपक भोजनें यानी तर आपल्या भाषणात पहिलेच स्पष्ट केले की मी जरी सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेटर्सचा अध्यक्ष असलो तरी मी आपल्या प्रत्येक उपस्थित सदस्यांना अध्यक्षांएवढाच हक्क देतोय इथे कोणीही लहानमोठा नाही. सावंतवाडी, कणकवली, मालवण, कुडाळ, देवगड तालुक्यातील सर्व लिजेंड क्रिकेटर्स यांनी आजच्या सभेच्या निमित्ताने आमचा आत्मविश्वास निर्माण केला, असे सांगितले.
यावेळी नंदु भाई टीकले, पराडकर सर, कुबल सर, राजन नाईक, नानाजी सारंग, बाबा सावंत सर, रुपेश पावसकर, वासु वरावडेकर, किशोर शेलटकर, बाळा मडगावकर, संतोष भाई, रघु धारणकर, श्री. कल्याणकर, सुशिल शेडगे, गुरु पालव, धनु टेमकर, अजय मोर्ये, सचिन पाटकर या सर्व सदस्यांनी मार्गदर्शन केले आणि आम्ही क्रिकेट मध्ये कमी पडणार नाही अशी ग्वाही दिली.
कुडाळ येथील रूपेश पावसकर यांनी मार्गदर्शन करून लिजेंड गृप साठी कायम कार्यरत राहू असे आश्वासन दिले. संघटनेचे खजिनदार सचिन पाटकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपले विचार व्यक्त केले. नवीन झालेली संघटना आणि त्याची कार्यकारिणीची पहिलीच सभा आणि तीही यशस्वी झाली. ती यशस्वी करण्यामागे आपल्या सर्वांचा उत्स्फूर्त सह्भाग. त्यासाठी सर्वांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. आज जसे एकत्र आलात तसेच कायम सोबत राहुयात आणि सिंधुदुर्ग लिजंड्स क्रिकेटला एका सन्मानजनक उंचीवर न्हेऊन ठेवुयात असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सुरेंद्र मडगावकर, संतोष मडगावकर, महेश भाट, बाळा चोडणकर, अरुण घाडी, बावतीस माडतीस, भरत गरुडकर, सचिन तोंडवळकर, दत्ताराम वराडकर, महेश धोंड, राजेंद्र काळसेकर,चंद्रशेखर कुडाळकर, श्री सचिन, रुपेश शिरोडकर, राजन पांचाळ, दीनेश कुडाळकर, सलाम खान आदी खेळाडू उपस्थित होते. सभेचे सुत्रसंचलन वासू वरवडेकर यांनी केले.

error: Content is protected !!