आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे मध्ये चिमुकल्यांची वेशभूषा स्पर्धा उत्साहात.

कणकवली/मयूर ठाकूर
विध्यार्थ्यांमधील कला गुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज वरवडे सतत विविध उपक्रम राबवते,याचाच एक भाग म्हणून नुकतीच प्रशालेत वेशभूषा स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेच्या परीक्षक, विध्यार्थी समुपदेशक सौ. मनीषा काणेकर, तसेच ज्ञानदा शिक्षण संस्था सल्लागार डी. पी तानावडे,शिक्षक पालक संघांचे सदस्य श्री.स्वप्नील कदम आणि आयडियलच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना देसाई,श्री.निलेश घेवारी सर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन पार पडले.
LKG ते इयत्ता 3 री पर्यंत घेण्यात आलेल्या या वेशभूषा स्पर्धेत एकापेक्षा एक व्यक्तीरेखा साकारत चिमुकल्यानी सर्वांची मने जिंकली. या स्पर्धेत एकूण सुमारे 55 विध्यार्थी सहभागी झाले होते.
त्याचप्रमाणे पालक व विध्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशाला शिक्षिका फातिमा कुडाळकर यांनी केले





