“पहिले तोरण गडाला” उपक्रमातंर्गत किल्ले भगवंतगडवर शस्त्र आणि गड पूजा करून गडाला बांधले तोरण

गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, सिंधुदुर्ग विभागाचा कौतुकास्पद उपक्रम
चिंदर गावच्या मानबिंदू भगवंतगड किल्ल्यावर गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, सिंधुदुर्ग विभागाच्या कार्यकर्त्यांनी “पहिले तोरण गडाला”हा कौतुकास्पद उपक्रम राबवला. २ ऑक्टोबर विजयादशमी दिवशी सकाळी गडावरील सिध्देश्वर मंदिराला तोरण बांधले त्यानंतर गडपूजन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा केली. शस्त्रपूजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यात गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागाचे प्रथमेश चव्हाण, वरद जोशी, स्वप्नील शिर्सेकर, हर्षद मडवळ, नारायण पाताडे, राजू पालकर, ग्रामपंचायत सदस्य केदार उर्फ पप्पू परूळेकर, भोगले, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.





