नगरपरिषद, नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण सोडत 6 ऑक्टोबर रोजी

मंत्रालयातील सहाव्या मजल्या वरील परिषद सभागृहात निघणार आरक्षण सोडत

राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत सोमवार 6 ऑक्टोबर 2025 रोजी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर परिषद सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील 247 नगरपरिषदा व 147 नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदांसाठी ही आरक्षण सोडत निघणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मंत्रालयिन प्रवेशाची स्थिती विचारात घेता सदर आरक्षणाच्या सोडतीसाठी आपल्या पक्षांचे दोन प्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात येत आहे. पक्षाच्या अध्यक्ष व सचिव यांनी दोन प्रतिनिधी यांची शिफारस करून आरक्षणाच्या सोडतीसाठी पाठवावे असे आदेश राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे अध्यक्ष सचिव यांना शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी छापवाले यांनी काढले आहेत.

error: Content is protected !!