तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे नेत्रदीपक यश

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ न. म. विद्यालय खारेपाटण व ज्युनियर कॉलेज खारेपाटण या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी कासार्डे हायस्कूल येथे पार पडलेल्या कणकवली तालुका स्तरीय विविध मैदानी स्पर्धामध्ये यश संपादन केले असून यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
यामध्ये ० ते १४ वर्षाखालील मुलांच्या कबड्डी स्पर्धेमध्ये – खारेपाटण हायस्कूल च्या संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. यामध्ये आयुष निलेश गुरव, आर्यन अनिल कोवळे, देवाशिष विकास कुलकर्णी, पियुष निलेश गुरव, राज सुभाष जेढे, विजय आप्पा हिप्परकर, श्रवण मनोहर कोलते, हर्ष रमेश तावडे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तर
१४ वर्षाखालील मैदानी स्पर्धेमध्ये – वेदिका उदय तावडे ४०० मीटर धावणे प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केला. श्रावणी सत्यवान सुतार ६०० मीटर धावणे प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला. कु. श्रेया भालचंद्र गोरुले गोळा फेक व थाळी फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला.तर आदिती अजय मण्यार हिने ६०० मीटर धावणे प्रकारात तृतीय क्रमांक प्राप्त करत यश मिळवले.
याबरोबरच तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा १७ वर्षे खालील मुलांच्या स्पर्धेमध्ये वैभव रामदास भीसे ४०० मीटर धावणे मध्ये द्वितीय क्रमांक तर ८०० मीटर धावणे द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच युवराज संतोष खांडेकर याने २०० मीटर धावणे प्रकारात द्वितीय क्रमांक मिळविला. तर यश नांदगावकर याने उंच उडी मध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. व
आर्यन मंगेश जाधव याने १०० मीटर धावणे प्रकारात तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच १९ वर्षे मुलींच्या कबड्डी स्पर्धेमध्ये खारेपाटण ज्युनिअर कॉलेजच्या मुलांचा संघ उपविजेता ठरला असून यामध्ये अनु महेश प्रभू, भक्ती शांताराम पास्टे, दीक्षा दीपक धुरी, दिव्या दिनेश रांबाडे, दीक्षा दीपक रांबाडे, गायत्री शिवाजी कांबळे, केतकी मंगेश जाधव, सृष्टी योगेश पास्टे या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.
तर १९ वर्षे मुलांच्या हॉलीबॉल गटामध्ये खारेपाटण ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांना देखील उपविजेते पद प्राप्त झाले असून यामध्ये आकाश अशोक जेधे, आकाश संजय सुतार, ओंकार संदीप सावंत, ओम महेश राऊत, तेजस यतीन राऊत, सुजल सुशील जाधव, स्वराज संतोष कदम, हर्ष परशुराम गुंडे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. याबरोबरच तालुकास्तरावरील रिले ४/१०० मीटर १९ वर्षे मुलांच्या गटात ज्युनिअर कॉलेज खारेपाटण च्या विद्यार्थ्यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. यामध्ये आयुष्य नितीन जाधव, दर्शन विशाल कावळे, पार्थ समीर पराडकर, शुभम शरद कांबळे, साहिल संजय पाटील या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
तसेच १९ वर्ष मुले – मुली तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये खालील विद्यार्थ्यांनी यश संपादित केले आहे. साहिल सुनील शेंगाळे – (थाळीफेक द्वितीय क्रमांक व १०० मीटर हर्डल्स प्रथम क्रमांक), सुजल किशोर भालेकर – (३००० मीटर धावणे प्रथम क्रमांक व तिहेरी उडी प्रथम क्रमांक), आयुष नितीन जाधव – (उंच उडी प्रथम क्रमांक), सौरभ राजू तावडे – (१०० मीटर धावणे तृतीय क्रमांक), ऋतुजा तानाजी कदम – (४००मीटर धावणे प्रथम क्रमांक), संचिता संदीप उगवे – (थाळीफेक तृतीय क्रमांक), तर हर्ष रमेश तावडे याने कराटे प्रकारात जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त करत नेत्र दीपक यश मिळवले आहे.
सर्व विद्यार्थ्यांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे,उपाध्यक्ष श्री. भाऊ राणे, सचिव श्री. महेश कोळसुलकर, संस्थेचे सर्व विश्वस्त खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. संजय सानप, पर्यवेक्षक – श्री संतोष राऊत व सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!