आशिये ग्रामपंचायतच्या माध्यमातून नागरिकांना दाखले देण्याची सेवा

सरपंच महेश गुरव यांची माहिती

सेवा पंधरवड्यानिमित्त आशिये ग्रामपंचायतचा उपक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा सप्ताह उपक्रम सुरु आहे. त्यानिमित्त गावात विविध सामाजिक बांधिलकीचे उपक्रम घेण्यात येत आहेत. गावातील नागरिकांना आपल्या ग्रामपंचायत मध्ये विविध दाखले देण्याची सेवा पंधरवड्यानिमित्त उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामध्ये विविध समाजातील घटकांना 9जातीचे दाखले ,15 जणांना वय आधिवास अशा दाखल्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती आशिये सरपंच यांनी दिली.
यावेळी ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी राकेश गोळवणकर, सदस्य सुहास गुरव, ग्रा. पं. सदस्या विशाखा गुरव, संजना ठाकूर, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख श्री. मसुरकर, मुख्याध्यापिका सौ. सावंत, शिक्षिका स्नेहा मोरे, शिक्षक सतिश कदम, शिक्षिका श्रीमती मसुरकर यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

आशिये ग्रामपंचायत मध्ये यापुढील काळात उत्पन्न दाखला, वय अधिवास दाखला, वय राष्ट्रीयत्व दाखला, रहिवास दाखला, नॉन क्रिमिलेयर दाखला, जातीचा दाखला, जेष्ठ नागरीक या विविध प्रकारचे दाखले देण्यात येणार आहेत. तरी नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच महेश गुरव यांनी केले आहे.

error: Content is protected !!