दोडामार्ग तालुका हत्तीमुक्त करण्याच्या मागणीसाठीचे शनिवारचे उपोषण स्थगित

प्रेमानंद देसाई यांची माहिती

येथील वनविभागाच्या कार्यालयासमोरील उद्या (ता.१)होणारे उपोषण तूर्त स्थगित करण्यात आल्याची माहिती सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी दिली. तिलारी खोर्‍यातील सर्व आजी माजी सरपंच उपसरपंच यांनी तिलारी खोर्‍यातील केर,मोर्ले,हेवाळे,मेढे परिसरात गेल्या महिन्यापासून हत्तीच्या दोन कळपाने काजू,नारळ,फोफळी व अन्य वृक्षलागवड व बागायतीमध्ये हैदोस घालून येथिल शेतकऱ्यांचे जीवनमान उद्वस्त करत असल्याने या तिलारी खोर्‍यातील सर्व आजी माजी सरपंच उपसरपंच यांनी एकत्रित येऊन तिलारी खोरे हत्तीमुक्त झाला पाहिजे म्हणुन पत्रकार परिषदेत तिलारी हत्तीमुक्त करा अन्यथा हत्तीपासून बचाव करण्यासाठी शुट करण्याची परवानगी द्यावी म्हणून पत्रकार परिषदेतून मागणी केलेली तसेच मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर यांचेशी प्रदीर्घ चर्चा पंधरा मार्च ला केली होती याची दखल घेऊन राज्य शासन वनविभाग यांनी तात्काळ वनबाधित क्षेत्रातील गावातील उपाययोजनांबाबत कार्यवाही सुरू केली.आज (ता ३१)रोजी उपवनसंरक्षक सावंतवाडी यांच्यासमवेत पुन्हा बैठक आयोजित करण्यात येऊन चर्चा झाल्यानंतर महिन्याभरात पूर्ण मोहीम होईल अशी हमी दिली व तिलारी खोरे व शेती होणार हत्तीमुक्त होणार असल्याची प्रशासनाने हमी दिल्याने व तशा आश्वासन मिळाल्यावर आमरण उपोषण तूर्त स्थगित करण्यात आले आहे यावेळी उपवनसंरक्षक श्री रेड्डी ,सहायक उपवनसंरक्षक श्री.सोनवडेकर ,वनक्षेत्रपाल श्री.मुक्कनावर, प्रेमानंद देसाई,गोपाळ गवस, संतोष मोर्ये.सुुजाता मणेरीकर ,सौ गवस,सौ संंजना धुमासकर उपस्थित होते.

प्रतिनिधी l दोडामार्ग

error: Content is protected !!