युवासेना कणकवली तालुका उपशहरप्रमुख प्रतीक रासम यांच्या वतीने हरकुळ खुर्द येथे शालेय वस्तूंचे वाटप

जि.परिषद प्राथमिक शाळा हरकुळ खुर्द येथील शाळेला दिल्या शालेय भेटवस्तू
कणकवली – युवासेना कणकवली तालुका उपशहरप्रमुख प्रतिक रासम व मित्रमंडळ यांच्या वतीने सरस्वती पूजन दिवशी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा हरकुळ खुर्द-मोहूळ शाळेतील मुलांना शालेय भेटवस्तू तसेच मुलांना खेळण्यासाठी कॅरम बोर्ड व शाळेतील शिक्षकांच्या मागणीनुसार अभ्यास क्रमासाठी उपयुक्त भारत देशाचा, महाराष्ट्राचा व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नकाशे देण्यात आले. प्रतीक रासम व मित्रमंडळाने केलेल्या सामाजिक उपक्रमा बद्दल हरकुळ खुर्द गावातून त्यांचे आभार मानले जात आहेत.
यावेळी युवासेना उपशहरप्रमुख प्रतीक रासम यांच्यासोबत राज विचारे, चेतन गुरव, रोहित आरोंदेकर, लवेश पांचाळ, पांधुरंग गुरव, अनिरुद्ध गावकर, गंगाजी रासम (वडील), योगिता रासम (आई), मुख्याध्यापक महेश पवार, शिवाजी देवकते, मीनल तळेकर, माजी शिक्षक श्रीकृष्ण बोभाटे, श्रद्धा बोभाटे, ग्रामस्थ विजय दळवी, कुमुदिनी दळवी, शशि मडव, चंद्रकांत मडव, दत्ताराम रासम, धोंडू (अण्णा) रासम, श्यामसुंदर रासम, शशांक रासम, लक्ष्मण रासम, सूर्याजी घोगळे, अशोक राणे, भिकाजी (दाजी) रासम आदी उपस्थित होते.





