‘टुरिझम 360’ या राष्ट्रीय चर्चासत्रांतर्गत स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन

दिनांक 26 व 27 सप्टेंबर रोजी महाविद्यालयात पर्यटन सप्ताहाचे औचित्य साधून राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सदर चर्चासत्राच्या निमित्ताने निमित्ताने निमित्ताने कोकण जॉग्रफर असोसिएशन व स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय सांस्कृतिक विभाग यांच्या वतीने निबंध, पोस्टर, वक्तृत्व, लोकनृत्य अशा विविध राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धांना भरभरून प्रतिसाद लाभला. पाच राज्यांमधून निबंध आणि पोस्टर जमा झाले होते. या अंतर्गत 15 निबंध, 18 पोस्टर, आठ वक्तृत्व स्पर्धेच्या स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला.
निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ ऋतुजा रामचंद्र कवटकर(संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ), तृतीय क्रमांक- तनिष्का विनय दळवी (स.ह. केळकर कॉलेज देवगड), आणि मयुरी संजय पाटील (गारगोटी कॉलेज) यांना विभागून देण्यात आला. द्वितीय क्रमांक- सपना सत्यवान नाईक (संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ) , रॉयल खैतान बुलेटो (फोंडाघाट कॉलेज) यांना विभागून देण्यात आला. प्रथम क्रमांक-मेगल डिसोजा (स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण) हिने पटकावला.
पोस्टर मेकिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक- कदम स्नेहल महेश (संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ) व श्रीराम गावडे ( स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण) यांना विभागून देण्यात आला. द्वितीय क्रमांक- देसाई निकिता प्रकाश (गारगोटी कॉलेज) आणि प्रथम क्रमांक -रासम सपना संतोष (फोंडाघाट कॉलेज) यांना मिळाला.
वक्तृत्व स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक एंजल गोसावी (स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण) तृतीय क्रमांक- मिसबा काझी (स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण) द्वितीय क्रमांक- श्रावणी गावडे (एस पी के लॉ कॉलेज सावंतवाडी) व पल्लवी गावडे (गारगोटी कॉलेज) आणि प्रथम क्रमांक- नीता धुरी (फोंडाघाट कॉलेज) यांना मिळाला.
लोकनृत्य स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक साक्षी परब आणि सानिया कदम (स का पाटील)यांच्या लोकनृत्याला मिळाला. तर द्वितीय क्रमांक स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाच्या कोळीनृत्याला मिळाला. प्रथम क्रमांक कोरकू या कोंडाघाट कॉलेजच्या आदिवासी नृत्याला मिळाला. या स्पर्धेतील बक्षिसांचे स्वरूप ट्रॉफी, डिक्शनरी, प्रमाणपत्र व मेडल असे होते.
बक्षीस वितरण समारंभासाठी डॉ. धवल पांड्या, अर्थशास्त्र विभाग (गुजरात), डॉ. अंशू वर्मा संगीत विभाग (राजस्थान), संस्थेचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण साहेब, सचिव गणेश कुशे, सदस्य, शैलेश पावसकर, सदस्य, डॉ रामचंद्र काटकर, स्कूल कमिटी अध्यक्ष, विजय केनवडेकर, अंतर्गत हमी कक्ष समिती सदस्य, लक्ष्मीकांत खोबरेकर, प्राचार्य डॉ. एस. ए. ठाकूर, अंतर्गत हमी कक्षाच्या समन्वयक डॉ. सुमेध नाईक मॅडम उपस्थित होत्या. सदर स्पर्धेसाठी कोकण जाॅग्राफरचे सचिव डॉ. राजाराम पाटील, स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख डाॅ. उज्वला सामंत, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. हंबीरराव चौगले यांचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!