कुडाळ येथे २ ऑक्टोबरला ह.भ.प. श्री. मांडके बुवांचे कीर्तन

कुडाळ : येथील श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळ यांच्या वतीने गुरुवार दिनांक २ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ९ वा. विजयादशमी निमित्त श्री देव कुडाळेश्वर मंदिर, कुडाळ येथे राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. संदीपबुवा मांडके रामदासी यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. कीर्तनाचे कथानक ‘वरवरदेश्वर चरित्र अर्थात पार्वती सांत्वन चरित्र आहे. कीर्तन रसिकांनी कीर्तनाला उपस्थित रहावे अशी विनंती आयोजकांतर्फ़े करण्यात आली आहे.

error: Content is protected !!