संत राऊळ महाराज महाविद्यालयात “करियर कट्टा-विद्यार्थी संवाद” कार्यशाळा

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या करिअर कट्टा उपक्रमाअंतर्गत संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे मंगळवारी राज्य समन्वयक यशवंत शितोळे यांनी भेट दिली. याप्रसंगी त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत त्यांना करिअर विषयक मार्गदर्शन केले. यावेळेस एकूण 122 विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमास करिअर कट्टा जिल्हा समन्वयक, अजित दिघे, करिअर कट्टा राज्यस्तरीय उद्योजकता विकास मंडळ सदस्य, प्राध्यापिका अक्षता मोंडकर, सिंधुदुर्ग जिल्हा प्राचार्य प्रवर्तिका व संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे, तसेच कुडाळ तालुका समन्वयक, प्रा. अजित कानशिडे व महाविद्यालयीन करियर कट्टा समन्वयक प्रा उमेश कामत व समिती सदस्य सुवर्णा निकम हे उपस्थित होते.
यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या करिअर संसदेच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत एकूण दहा महाविद्यालयांचा सहभाग होता. जिल्ह्याच्या विविध महाविद्यालयातून १०१ विद्यार्थी संसद पदाधिकारी उपस्थित होते व प्रत्येक महाविद्यालयातून महाविद्यालयीन समन्वयक उपस्थित होते. या बैठकीत शितोळे सरांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत ,करिअर संसदेचे महत्त्व, जबाबदाऱ्या व भविष्यातील दिशा याबाबत मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळून करिअर विषयक दृष्टी अधिक व्यापक होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.





