आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेच्या वतीने महिला अधिकाऱ्यांचा ‘नवदुर्गा’ म्हणून गौरव*!

कणकवली/मयूर ठाकूर

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना (International Human Rights Ambassador Organization) च्या वतीने वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये ,विविध क्षेत्रात,कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्यांचा ‘नवदुर्गा’ म्हणून सत्कार करण्यात आला.
यात जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिशे, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, चेअरमन शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली .डॉ,राजश्री साळुंखे ,अपर पोलीस अधीक्षक .नयोमी साटम ,जिल्हा कृषी अधीक्षक .भाग्यश्री नाईकनवरे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी, शिक्षणाधिकारी .कविता शिंपी,नगरपंचायत मुख्याधिकारी .गौरी पाटील, परिविक्षा अधिकारी अंकुर केंद्र सावंतवाडी लक्ष्मी झांबोरे ,सहाय्यक अभियंता मराविवी छाया परब या प्रशासकीय सेवेत असलेल्या नवदुर्गाचा सन्मान करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय ह्यूमन राइट्सच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केला. महिला सक्षमीकरण व मानवाधिकार रक्षण करणाऱ्या या महिला अधिकाऱ्यांचा सन्मान करताना संघटनेने त्यांच्या प्रशासकीय सेवेचे कौतुक केले.
कार्यक्रमात उपस्थित पदाधिकाऱ्यांनी महिलांच्या कार्यक्षमतेचा व कर्तृत्वाचा विशेष उल्लेख करून त्यांना प्रेरणास्त्रोत ठरवले. सत्कारामध्ये पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. हरीभाऊ भिसे, महिला जिल्हा अध्यक्षा सुरेखा भिसे, जिल्हा मीडिया अध्यक्ष व प्रसिद्ध प्रमुख दयानंद मांगले,महिला जिल्हा कार्याध्यक्ष दीपिका मेस्त्री, उपाध्यक्ष दयानंद तेली , उपाध्यक्ष डॉ.गणेश उर्फ भाई बांदकर,उपाध्यक्ष श्री राजन भोसले सीनियर सिटीजन सेक्रेटरी सौ. रिमा भोसले, महिला उपाध्यक्ष दीक्षा तेली ,सरचिटणीस शरयू ठुकरुल,एससी एसटी मागासवर्गीय संरक्षण पूजा जाधव., मजूर संरक्षण बाबाजी गोवेकर, कुडाळ तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण शिरोडकर,संजय खोत, दुर्वांकुर मेस्त्री
इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
समाजात महिलांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित व्हावे या हेतूने सदर सत्कार आयोजित करण्यात आला.
महिला अधिकारी म्हणजे केवळ प्रशासनाचा भाग नसून त्या समाज परिवर्तनाच्या मूळ गाभ्यातील शक्ती आहेत आणि म्हणूनच नवरात्रीचे औचित्य साधून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा नवदुर्गा म्हणून गौरव व महिलांच्या सहभागाचा सन्मान करण्यात आला.याचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा महिला पदाधिकारी यांनाही जिल्हा पदाधिकारी यांनी नवदुर्गा म्हणून पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.
फोटो- सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा नवदुर्गा गौरव करताना आंतरराष्ट्रीय मानव धिकार संघटना जिल्हा पदाधिकारी ( छाया -दुर्वाकूर मेस्त्री )

error: Content is protected !!