सतीश चव्हाण यांच्या ” कोळीण ” या कादंबरीचे प्रकाशन डॉ सतीश पवार यांच्या हस्ते.

कणकवली/मयूर ठाकूर
सुकळवाड येथील कवी आणि लेखक सतीश चव्हाण यांच्या कोळीण या कादंबरीचे प्रकाशन गुरुवार दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी नगर वाचनालय कणकवली येथे साहित्यिक डॉ सतीश पवार यांच्या हस्ते सायंकाळी साडे चार ते सहा या वेळात होणार आहेत. या कार्यक्रमाला मधुकर मातोंडकर, चंद्रसेन पाताडे, सरिता पवार, स्नेहलता राणे सरंगले , पंडित माने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हे पुस्तक विघ्नेश पुस्तक भंडार यांनी प्रकाशित केले आहे.
कोळीण ही कादंबरी मालवणी जीवनातील होळीच्या दिवसात होणाऱ्या कोळीण , गोमू अथवा नाच्या या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लोककलेबद्दल आहे.
तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन लेखक सतीश चव्हाण यांनी केले आहे.





