जेरॉन फर्नांडिस यांचे अक्षर दातृत्व आदर्शवत – सुरेश ठाकूर

आपण शब्दांचा,म्हणींचा ,वाक्प्रचारात नेहमी वापर करत असतो.पण त्या पलीकडे त्या शब्दांचा प्रवास दडलेला असतो. या शब्दांच्या कुळकथा आणि मुळ कथांमधून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी त्यांची साहित्यिक रुची वाढावी या दृष्टीने आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या दातृत्वातून मुलांना शब्दांच्या पलीकडले पुस्तके उपलब्ध करून दिली .त्यांचे हे अक्षरदान आदर्शवत असल्याचे मत साहित्यिक सुरेश ठाकूर यांनी आचरा हायस्कूल येथे व्यक्त केले.
नुकतच प्रकाशित झालेले सुरेश ठाकूर यांच्या शब्दांच्या पलीकडले या अनोख्या मराठी शब्दांची मुळकथा स्पष्ट करणा-या पुस्तकाच्या ८०प्रतींचे वितरण जेरॉन फर्नांडिस यांच्या देणगीतून आचरा हायस्कूल च्या दहावीच्या मुलांना पुस्तकाचे लेखक सुरेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जेएम फर्नांडिस, समिती सदस्य राजन पांगे, अर्जुन बापर्डेकर, मुख्याध्यापक अंकुशराव घुटूकडे, माजी केंद्र प्रमुख सुगंधा गुरव, उपमुख्याध्यापिका मधुरा माणगांवकर, अनघा कदम ,यांसह अन्य मान्यवर विद्यार्थीवर्ग आदी उपस्थित होते. आपण शाळेत शिकवत असताना विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेतून शब्दांचा इतिहास शोधण्याची स्फूर्ती मिळाली. यातूनच शब्दांच्या पलीकडले या पुस्तकाची निर्मिती झाल्याचे सुरेश ठाकूर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अक्षर दाते फर्नांडिस यांच्या दातृत्वाचे कौतुक केले. कार्यक्रमाची सुरुवात मुलांनी सादर केलेल्या सुश्राव्य बोलतो मराठी गीताने झाली. त्यांना साथ दिली होती अनिरुद्ध आचरेकर आणि पाटकर यांनी केली.





