सिंधुकन्या अक्सा मुद्स्सरनझर शिरगावकरचा सी बी एस ई नॅशनल आर्चरी चॅम्पियन स्पर्धेत सुवर्णवेधसह डबल धमाका

स्कोअरिंग राउंड मध्ये सुवर्णपदक तर इलिमीनेशन राउंडमध्ये कांस्यपदक
गोल्ड आणि ब्रॉंझ मेडल पटकावत सिंधुदुर्ग चे नाव देशभरात केले रोशन
सिंधुकन्या अक्सा मुद्स्सरनझर शिरगावकर हिने सी बी एस ई नॅशनल आर्चरी चॅम्पियन स्पर्धेत सुवर्णवेध करतानाच कांस्यपदक पटकावून डबल मेडल जिंकले आहे. सीबीएसई नॅशनल आर्चरी चॅम्पियन स्पर्धेत गोल्ड मेडलसह कांस्य पदक पटकावून अक्सा हिने संपूर्ण देशभरात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. 14 वर्षाखालील वयोगटात aksa ने हे सुवर्णयश प्राप्त केले आहे. पंजाब मधील संगरूर येथे 19 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान सीबीएसई नॅशनल आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत देशभरातून राज्यात अव्वल आलेले एकूण 72 स्पर्धक सहभागी झाले होते. Aksa शिरगावकर हिने स्कोअरिंग राउंड मध्ये सुवर्णपदक तर इलिमीनेशन राउंड मध्ये कांस्यपदक पटकावले. अवघ्या साडेतीन वर्षांच्या आपल्या धनुर्विद्या करिअर मध्ये अक्सा हिने यापूर्वीही आर्चरी स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक तसेच सिल्व्हर मेडल प्राप्त केली आहेत. कणकवली शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कुलमध्ये इयत्ता आठवित शिकत असलेली अक्सा ही मागील अडीच वर्षे सातारा येथील माजी सैनिक प्रवीण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सावंत यांच्या दृष्टी निवासी अकादमी मध्ये आर्चरी चे प्रशिक्षण घेत आहे. कणकवली कलमठ गावातील प्रतिथयश शासकीय ठेकेदार, एम्पायर रिअलइन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड चे सर्वेसर्वा श्री. मुद्स्सरनझर शिरगावकर आणि न्यू खुशबू स्वयंसहाय्यता संघ आणि जिजाऊ प्रभाग संघाच्या माध्यमातून शेकडो महिलांना स्वयंरोजगार मिळवून देणाऱ्या श्रीमती तन्वीर शिरगावकर यांची जेष्ठ सुकन्या असलेल्या अक्सा हिने मिळविलेल्या या दैदिप्यमान यशाबद्दल तिचे जिल्ह्यासह राज्यभरातील क्रीडा वर्तुळातून अभिनंदन होत आहे.





