वायंगणी येथील स्वामी समर्थ मठात २६स्प्टेंबर रोजी ललितोत्सव

श्री स्वामी समर्थ मठ वायंगणी येथे ललित पंचमी उत्सवानिमित्त शुक्रवार २६सप्टेंबर रोजी श्री स्वामी समर्थ यांचे आदिशक्ती आदिमाया स्वरूपातील दर्शन सोहळा होणार आहे. यानिमित्त पहाटे पाच वाजता मंगल स्नान, सकाळी सात वाजता नित्य आरती, सकाळी नऊ वाजता श्रींवरमहिलांसाठी कुमकुम अभिषेक व तीर्थ प्रसाद ,दुपारी महाआरती, महाप्रसाद रात्रीआठ वाजता स्थानिकांची भजने आदी कार्यक्रम होणार आहेत. तरी भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ वायंगणी यांच्याकडून करण्यात आले आहे.





