खारेपाटण प्रा.आ केंद्र येथे १९ सप्टेंबर २०२५ रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर

महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री सचिवालय मुख्यमंत्री सहाय्यता मोदी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष व जिल्हा प्रशासन सिंधुदुर्ग यांच्या समन्वयाने “नमो नेत्र संजीवनी स्वास्थ अभियान” अंतर्गत कणकवली तालुक्यातील खारेपाटण प्रा. आ. केंद्र येथे शुक्रवार दि. १९ सप्टेंबर २०२५ रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. १७ सप्टेंबर २०२५ ते दि. २ ऑक्टोबर २०२५ या कालावधी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात “नमो नेत्र संजीवनी स्वास्थ अभियान अंतर्गत मोफत नेत्र विकार निदान व शस्त्रक्रिया शिबिर शासनाच्या वतीने राबविण्यात येणार असून या शिबिरात तज्ञ डॉक्टरकडून डोळ्यांचे प्राथमिक विकार तपासणी, चष्म्याचे नंबर तपासणी, मोतीबिंदू तपासणी मोफत करण्यात येणार आहे.
तसेच या शिबिरात नेत्र रुग्णांना मोफत चष्मे वाटप देखील करण्यात येणार आहेत. व जे रुग्ण मोतीबिंदू बाधित असतील अशा रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग व जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे करण्यात येणार आहे.तरी मोफत नेत्र तपासणी शिबिराचा खारेपाटण दशक्रोशितल नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.





