खारेपाटण हायस्कूल येथे शालेय विद्यार्थ्याना-लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्ग यांच्या वतीने मार्गदर्शन

खारेपाटण हायस्कुल येथे नुकतेच समाजामध्ये वाढणाऱ्या लाचखोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लाचलूचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्ग तर्फे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष मार्गदर्शन वर्गाचे आयोजन नुकतेच खारेपाटण हायस्कूल येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अँटी करप्शन विभाग सिंधुदुर्गचे पोलीस उपअधीक्षक श्री. विजय पांचाळ सर व पोलीस निरीक्षक श्री. दीपक माळी सर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.
सद्यस्थितीत शासकीय तसेच इतर सर्व आस्थापनांमध्ये लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. लाच देणे आणि लाच घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरीही असे प्रकार निदर्शनास येत आहेत. याच पार्श्वभूमीवर अँटी करप्शन विभाग सिंधुदुर्गचे पोलीस उपअधीक्षक श्री. विजय पांचाळ सर व पोलीस निरीक्षक श्री. दीपक माळी सर यांनी खारेपाटण हायस्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले होते. आजचे विद्यार्थी हे उद्याच्या देशाचे जागरूक नागरिक आहेत. त्यामुळे लाच लुचपत विभागामार्फत जनजागृती करण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे यावेळी श्री. दीपक माळी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अँटी करप्शन विभाग सिंधुदुर्गचे पोलीस उपअधीक्षक श्री. विजय पांचाळ सर व पोलीस निरीक्षक श्री. दीपक माळी सर व उपस्थित सर्व मान्यवरांचे प्रशालेच्या वतीने प्राचार्य श्री. संजय सानप यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. संतोष राऊत, शिक्षक वर्ग उपस्थित होते.

error: Content is protected !!