खारेपाटण ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गाशी संबधीत विविध समस्यांबाबत सहाय्यक अभियंता वृषाली पाटील यांना दिले लेखी निवेदन

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या खारेपाटण येथील उपविभाग कार्यालयाच्या सहाय्यक अभियंता श्रीमती वृषाली पाटील यांची मंगळवारी खारेपाटण ग्रामस्थानी भेट घेत येथील राष्ट्रीय महामार्गाशी संबधीत असलेल्या विविध अपूर्ण कामांच्या समस्यांचा पाडा वाचत आपल्या विविध मागण्याचे लेखी निवेदन सादर केले.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या विविध अपूर्ण कामाच्या समस्या बाबतीत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी खारेपाटण ग्रामस्थानी एकत्र येत गेल्या आठवड्यात येथील उपविभाग कार्यालयासमोर मोर्चा नेत आंदोलन केले होते.मात्र यावेळी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी अधिकारी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थ नाराज झाले होते.या पार्श्वभूमीवर जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या खारेपाटण उपविभाग कार्यालयाच्या सहाय्यक अभियंता श्रीमती वृषाली पाटील या कनिष्ठ अभियंता बी जी कुमावत यासह खारेपाटण ग्रामपंचायत कार्यालयात आल्या होत्या. यावेळी खारेपाटण सरपंच सौ. प्राची ईसवलकर यांनी लेखी निवेदन देत खारेपाटण येथील महामार्गाशी संलग्न कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी माजी सरपंच व भाजप पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री रमाकांत राऊत, शिवसेना उबठा कणकवली उपतालुका प्रमुख श्री. महेश कोळसुलकर, शिवसेना कणकवली तालुका प्रमुख श्री. मंगेश गुरव, सामाजिक कार्यकर्ते श्री. संतोष पाटणकर,माजी सरपंच श्री. किशोर माळवदे, ग्रा. पं. सदस्य श्री. जयदीप देसाई, सुधाकर ढेकणे, सौ. मनाली होणाळे, अस्ताली पवार, श्री. उपाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थानी खारेपाटण गावात राष्ट्रीय महामार्ग गेला असून येथील कामकाज समाधान कारक झाले नसल्याचे सांगून येथील कनिष्ठ अभियंता श्री. कुमावत यांच्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तर खारेपाटण कार्यालयासाठी कायमस्वरूपी सहायक अभियंत्यांची नेमणूक करणे खारेपाटण येथे ब्रिजच्या दोन्ही बाजूला तसेच रामेश्वर नगर स्टॉप येथे रंबलर लावण्यात यावेत.तसेच खारेपाटण बॉक्सवेल पुलावर बंद असलेले पथदीप सुरूं करणे बॉक्सवेल अंडर पास मध्ये लाइट लावणे वसुरक्षेचा कारणास्तव आरसे बसविणे, महामार्गाच्या दोन्ही बाजूला अपूर्ण असलेला सर्विस रोड तातडीने बनविणे, साईड गटारे व रस्त्यावरील पाण्याचा निचरा करणे, महामार्गावर आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे, महामार्गाचे रस्त्यावरील पाणी गावातील रस्त्यावर येत असल्याने खारेपाटण हायस्कूल जवळ रस्ता खराब झाला आहे. ते तातडीने दुरुस्त करणे आदी मागण्या यावेळी ग्रामस्थानी अधिकाऱ्यांकडे केल्या.
दरम्यान खारेपाटण येथील महामार्गाशी संबधीत विविध अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्यात येथील असे बांधकाम विभागाच्या सहाय्यक अभियंता श्रीमती वृषाली पाटील यांनी ग्रामस्थानी सांगितले. तर खारेपाटण येथील विविध समस्यांचे निवारण संबंधित अधिकाऱ्याने तातडीने न केल्यास पुन्हा एकदा तीव्र आंदोलन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येणार असल्याचा इशारा माजी सरपंच श्री. रमाकांत राऊत यांनी दिला.

error: Content is protected !!