झुंजार मित्र मंडळ खारेपाटण च्या वतीने नवरात्रोत्सव – २०२५ चे दमदार आयोजन

स्थानिक १०० महिलांचा सहभाग असलेला शिवराज्याभिषेक सोहळा ठरणार विशेष आकर्षण

विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह जिल्हास्तरीय ढोलवादन स्पर्धेचे आयोजन

खारेपाटण येथील सामाजिक,सांस्कृतिक, शैशणिक, क्रीडा व आरोग्य क्षेत्रात अग्रेसर असलेल्या झुंजार मित्र मंडळ खारेपाटण या मंडळाच्या वतीने दि. २२ सप्टेंबर २०२५ ते ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सार्वजनिक नवरात्रोत्सव – २०२५ चे भव्य आयोजन खारेपाटण शहरात करण्यात आले असून यानिमीत्ताने विविध संस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमासह भव्य जिल्हास्तरीय ढोल वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती झुंजार मित्र मंडळ खारेपाटण चे अध्यक्ष श्री. संकेत शेट्ये यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
झुंजार मित्र मंडळ खारेपाटण आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे हे ३१ वे वर्ष असून खारेपाटण बाजापेठ येथील श्री देव विष्णू मंदिर येथे येथे दि. २२ सप्टेंबर २०२५ वा. स. १०.०० वाजता देवीच्या मूर्तीची ढोल ताशांच्या गजरात भव्य आगमन मिरवणूक काढून प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. दि. २२/९/२०२५ रोजी देवीची घटस्थापना रात्री ९.३० वाजता सामूहिक गरबा, दि. २४/९/२०२५ रोजी स. ११.०० वा. प्रश्नमंजुषा स्पर्धा, दि. २६/९/२०२५ रोजी रात्री ९.३० वा. वेशभूषा स्पर्धा, दि. २७/९/२०२५ रोजी स. ९.३० वा. रक्तदान शिबिर व अवयवदान सामूहिक प्रतिज्ञा पठण, रात्री ८.३० वा. भव्य जिल्हास्तरीय ढोल वादन स्पर्धा ठेवण्यात आली असून प्रथम क्रमांक विजेत्या संघास रोख रुपये १५०००/- रुपये व आकर्षक चषक तर उपविजेता संघास रोख रुपये १००००/- व आकर्षक चषक आणि तृतीय क्रमांक विजेता संघास रोख रु ७००० /- रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
तसेच दि. २८/९/२०२५ रोजी सायं. ४.०० वा. विविध फनीगेम स्पर्धा दि. २९/९/२०२५ रोजी स. १०.०० वा. होम हवन दु. १.०० ते ३.०० वा. महाप्रसाद, रात्री ९.०० वा. महिलांसाठी खास आकर्षण – “होम मिनिस्टर स्पर्धा”तर दि. ३०/९/२०२५ रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील भजन मंडळांची भव्य भजन गायन स्पर्धा या नवरात्रीउत्सव चे विशेष आकर्षण असलेला भव्य सांस्कृतिक कार्यक्रम दि. १ ऑक्टोंबर २०२५ रोजी रात्री ११.०० वा. खारेपाटण एस टी बस स्थानक येथे खारेपाटण मधील १०० महिलांचा सहभाग असलेला सूरज गोडवे व सुमित रोडी यांनी नृत्य दिग्दर्शन केलेला टाळनृत्य सहित भव्य शिवराज्यभिषेक सोहळा कार्यक्रम सादर होणार आहे. तर दि. ४ ऑक्टोंबर २०२५ रोजी सायं. ४.०० वा. पारंपरिक पद्धतीने देवीची भव्य विसर्जन मिरवणुकीने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी या संपूर्ण कार्यक्रमाला ग्रामस्थानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास सहकार्य करावे असे आवाहन झुंजार मित्र मंडळ खारेपाटणच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.

error: Content is protected !!