आचरा येथे कृषी विकासासाठी कार्यरत परिवर्तन प्रकल्पाचे आ. निलेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

आचरा परीसरातील 25 गावांच्या शाश्वत विकासासाठी पुढील चार वर्ष करणार संस्था काम

शेतकरी आणि शेती विकासासाठी कार्य करणा-या परिवर्तन प्रकल्पाचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या हस्ते आचरा येथे करण्यात आला. यावेळी त्यांनी या परीवर्तन प्रकल्पाबाबत माहिती जाणून घेतली. तसेच येथील शेतक-यांच्या हितासाठी आणि शेती विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेनेचे संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख महेश राणे, आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस, वायंगणी सरपंच रुपेश पाटकर, हडी सरपंच प्रकाश तोंडवळकर, आचरा उपसरपंच
संतोष मिराशी, जयप्रकाश परुळेकर, डॉ. प्रमोद कोळंबकर, अभय भोसले, सचिन हडकर, अभिजित सावंत, मनोज हडकर, पंकज आचरेकर, महेंद्र घाडी यांसह अन्य शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते, वनराई ट्रस्ट चे सागर धारीया
पश्चिम महाराष्ट्र , एचडीएफसी बँक झोनल प्रमुख रुपक महापात्रा केदार कुलकर्णी यांसह ग्रामस्थ आदी उपस्थित होते. या प्रकल्पा अंतर्गत आचरा परीसरातील 25 गावांचा समावेश असून पुढील चार वर्षापर्यंत त्याची अमंलबजावणी करण्यात येणार आहे. याबाबत माहिती देताना धारिया यांनी सांगितले कि सिंधुदुर्ग मध्ये हा पहिलाच प्रकल्प असून येथील पाण्याचा योग्य वापर करत कसा शाश्वत विकास घडवायचा, शेती व्यवसायातून उत्पन्न कसे वाढवायचे या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले. पुढील चार वर्षाच्या कालावधीत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, शाश्वत कृषी विकास, मासेमारी व्यवसाय वत्यासंबंधी उद्योग उपक्रम, उपजिविका वृद्धी, शिक्षण आणि शैक्षणिक सुविधा आरोग्य व पोषण या बाबींवर विविध कामे राबवली जाणार असल्याची माहिती वनराई संस्थेतर्फे देण्यात आली.

error: Content is protected !!