झारापमध्ये अंध बांधवांच्या भजनाचे सर्वांकडून कौतुक

अनंत चतुर्थी निम्मित आज गणेश प्रासादिक अंधबांधव भजन मंडळ सिंधुदुर्ग,यांनी झाराप येथील सरपंच दक्षता मेस्त्री यांच्या निवासस्थानी भजनाचा कार्येक्रम आयोजीत केला होता. स्थानिकांनी याचे कौतुक केले.
गणेश प्रासादिक अंधबांधव भजन मंडळ सिंधुदुर्ग या भजन मंडळाचे मुख्य उद्दिष्ट ग्रामीणआणि स्थानिक पातळीवर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे, भजनाद्वारे पारंपरिक संस्कृतीचे जतन करणे आणि या मंडळांना आर्थिक मदत मिळवून देणे हे आहे. त्यांना भजन-कीर्तन करून कला सादर करता येते आणि त्यामुळे ग्रामीण भागातील सांस्कृतिक परंपरा जिवंत राहतात.
या भजन मंडळात हार्मोनियम साथ शेखर आळवे, तबला साथ दिगबर दळवी, सुधाकर गवस, गायक बाबूराव गावड़े, समीर नाईक, संतोष दळवी, सदानंद पावले, अनिल शिगाड़े, रमेश लोणकर, विनायक देसाई, प्रकाश वाघ, श्याम सुंदर माजगावकर, अरविंद आळवे या अंध बांधवानी सहभाग घेतला.
सिंधुदुर्ग साईकृपा अपंग संस्था, राष्ट्रीय दृष्टिहीन महासंघ, या संस्थानी एकत्र येऊन या मंडळाच्या वतीने सांस्कृतिक संवर्धन, भजन, कीर्तन या सारख्या पारंपरिक कला प्रकारांना प्रोत्साहन देऊन त्यांचे जतन केले जाते. सामाजिक सलोखा, ग्रामीण भागातील समाजामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून एकोपा निर्माण करण्याचे काम हे मंडळ करते. कलाकारांना प्रोत्साहन देऊन भजनी मंडळांमधील कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी संधी उपलब्ध करून देते. गावागावांमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना यामुळे चालना मिळते आणि लोकांचे मनोरंजन होते.  या योजनेमुळे पारंपरिक भजनी परंपरा आणि कला प्रकारांचे पुनरुज्जीवन होते.

error: Content is protected !!