पाट हायस्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पाट संचलित एस. एल.देसाई विद्यालय, पाट आणि कै. सौ.सीताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालय, पाट येथे दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी संस्था कार्याध्यक्ष देवदत्त साळगावकर, मुख्याध्यापक राजन हंजनकर, ज्येष्ठ शिक्षक गुरुनाथ केरकर,सौ अंकिता मोडक संदीप साळसकर, पूर्वा नाईक, सुधीर देसाई, सिद्धी चव्हाण उपस्थित होते.
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन १९६२ ते १९६७ पर्यंत भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून आणि १९५२ ते १९६२ पर्यंत भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून काम केले. सोव्हिएत युनियनमधील भारताचे दुसरे राजदूत देखील होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतः एक उत्तम शिक्षक असल्यामुळे त्या पेशाबद्दल वाटणारे प्रेम आणि त्यासाठी केलेले ४० वर्षांचे कार्य यांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने ५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस ‘शिक्षकदिन’ म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले. दरवर्षी पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो
माजी शालेय शिक्षण मंत्री व विद्यमान आमदार माननीय दीपकजी केसरकर मित्र मंडळातर्फे देण्यात येणारा “गुरु सेवा पुरस्कार “(आदर्श शिक्षक पुरस्कार) कै. सौ. सीताबाई रामचंद्र पाटील ज्युनिअर, पाट कॉलेजच्या प्रा. सौ. शीला संदीप सामंत यांना सन २०२५-२६ साठी जाहीर झाला आहे. त्यांचाही सन्मान यावेळी कार्याध्यक्ष साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे संस्थेकडून गुरुवर्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतो. यावर्षीही संस्थेच्या वतीने सर्व उपस्थित शिक्षक वर्गांना गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. यज्ञा साळगावकर यांनी केले तर आभार प्रदर्शन गुरुनाथ केरकर यांनी केले.

error: Content is protected !!