कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुल यांनी घेतली पालकमंत्री नितेश राणे यांची भेट

सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवलीचे कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुल यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांची कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली.

त्यांनी पदभार स्वीकारल्यावर पालकमंत्र्यांची घेतलेली ही भेट आहे.

या भेटीदरम्यान विभागाच्या कामकाजाबाबत चर्चा झाली. पावसामध्ये तसेच सणासुदीला सार्वजनिक बांधकामने रस्ते सुस्थितीत ठेवावेत अशी सूचना पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी केली. यावेळी पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी कार्यकारी अभियंता दिनेश बागुल यांचे स्वागत केले.

error: Content is protected !!