चेंदवणच्या सौ. सुधा कांबळी आणि सौ. वंदना टुंबरे रोटरी न्यूज मासिकाच्या मुखपृष्ठावर

कुडाळ रोटरी क्लबच्या फळझाडरोप वितरणाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल

कुडाळ तालुक्यातील चेंदवण गावच्या महिला शेतकरी सौ. सुधा सुधाकर कांबळी व सौ. वंदना बाळा टुंबरे या आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोटरी न्यूज मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकल्या आहेत. रोटरी क्लब, इनरव्हिल क्लब ऑफ कुडाळ, डोकोजू फाऊंडेशन बेंगलोर, माजी उपसरपंच सौ. रश्मी नाईक आयोजित चेंदवण – कवठी मधील ३०० महिला शेतकऱ्यांना ६०० फळझाडेरोप वितरण कार्यक्रम झाला. काळसे धामापूर येथील शेतकऱ्यांना फळझाडेरोप वितरण, जि. प. शाळा कुडाळ सांगिर्डेवाडी शाळेचा फळझाडेरोप वितरण कार्यक्रम याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोटरी न्यूज मासिकाने घेतली आहे.
रोटरी न्यूज हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मासिक दर महिन्याला प्रकाशित होत असते. सप्टेंबर २०२५ मध्ये प्रकाशित झालेल्या रोटरी न्यूज मासिकात फळझाडेरोप वितरण कार्यक्रमातील सौ. सुधा सुधाकर कांबळी यांचा फोटो मुखपृष्ठावर झळकला आहे. तर सविस्तर लेख या मासिकात प्रसिद्ध झालेला असून सौ. वंदना बाळा टुंबरे यांचाही फोटो या मासिकात झळकला आहे. संपूर्ण जगभरात हे मासिक प्रत्येक रोटरी सदस्यांना पाठवले जाते. या मासिकात जगभरातील अनोख्या पर्यावरणपूरक, सामाजिक उपक्रमांची दखल घेऊन प्रसिध्दी दिली जाते.
६०० फळझाडेरोप वितरण कार्यक्रमाची दखल रोटरी न्यूज सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील मासिकाने घेवून चेंदवण गावातील ३०० महिला शेतकऱ्यांच्या उपक्रमास आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली हि बाब चेंदवण गावासाठी अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन चेंदवण गावच्या माजी उपसरपंच सौ. रश्मी नाईक यांनी केले आहे.
बेंगलोरचे रोटरियन रविशंकर डोकोजू यांचे डोकोजू फाऊंडेशन व या फाऊंडेशनचे ट्रस्टी नील जोसेफ यांचे आभार या फळझाडेरोप उपक्रमाचे प्रमुख गजानन कांदळगावकर व राजन बोभाटे यांनी व्यक्त केले आहे. डोकोजू फाऊंडेशन बेंगलोर ने रोटरी क्लबच्या व इनरव्हील क्लबच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागात ५ वर्षात ५० हजार फळझाडेरोप वितरित करून वृक्षसंवर्धन करण्याचा संकल्प हा आदर्शवत आहे.
डोकोजू फाऊंडेशन बेंगलोर व गजानन कांदळगावकर व राजन बोभाटे यांचे सहकार्यातून इनरव्हील क्लब ऑफ कुडाळला चेंदवण व कवठी गावातील ३०० गरजू महिला शेतकऱ्यांना ६०० फळझाडेरोप वितरित करण्याचा उपक्रमाची दखल रोटरी न्यूज आंतरराष्ट्रीय मासिकाने घेतल्याने ग्रामीण भागातील गरजू महिला शेतकऱ्यांना उभारी मिळाली आहे. यासाठी चेंदवण गावच्या माजी उपसरपंच सौ. रश्मी नाईक यांचेही आभार सौ. मदने यांनी व्यक्त केले. डोकोजु फाऊंडेशन बेंगलोरच्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ कुडाळ व इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रोटरी क्लबना उपलब्ध होणारी प्रतिवर्षी १० हजार फळझाडेरोप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी यांना “धन्यवाद डोकोजू ” उपक्रमांतर्गत वितरण कार्यक्रम व वृक्षसंवर्धन उपक्रम हा रोटरीची इमेज समाजामध्ये आदर्शवत निर्माण करण्यासाठी रोटरी न्यूज मासिकाने घेतलेली दखल प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कुडाळ अध्यक्ष राजीव पवार यांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!