शिवसेनेच्या गणेश सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर

आमदार निलेश राणे यांनी पुरस्कृत केली होती स्पर्धा

साई तळवणेकर, सत्यवान राऊळ, तुषार आजगावकर विजेते

कुडाळ : आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेना आयोजित गणेश सजावट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक श्रीरामवाडी येथील साई तळवणेकर, द्वितीय क्रमांक कुडाळेश्वरवाडी येथील सत्यवान राऊळ, तृतीय क्रमांक लक्ष्मीवाडी येथील तुषार आजगावकर तर उत्तेजनार्थ श्रीरामवाडी येथील विघ्नेश पाटील यांनी क्रमांक पटकावले. या स्पर्धेमध्ये ९१ स्पर्धक सहभागी झाले होते तसेच वार्ड निहाय निकाल जाहीर करण्यात आला आहे.
आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने कुडाळ शहर मर्यादित गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये ९१ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेला उस्फुर्त असा प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये १७ वार्ड निहाय आणि संपूर्ण शहरातून असे क्रमांक काढण्यात आले आहेत. स्पर्धेचे परीक्षण महेश राऊळ व रजनीकांत कदम यांनी केले.
स्पर्धेतील वार्ड निहाय निकाल पुढीलप्रमाणे – वार्ड क्रमांक १ (कविलकाटे) प्रथम निलेश जळवी, द्वितीय जळवी कुटुंबीय, तृतीय दादा जळवी, वार्ड क्रमांक २ (भैरववाडी) प्रथम अरविंद मेस्त्री, द्वितीय राहुल मेस्त्री, तृतीय श्रेयश कुडाळकर, वार्ड क्रमांक ३ (लक्ष्मीवाडी) प्रथम तुषार आजगावकर, द्वितीय पप्पू पाटणकर, तृतीय साईनाथ नेमळेकर, वार्ड क्रमांक ४ (बाजारपेठ पान बाजार) प्रथम सचिन सावंत, द्वितीय भूषण मठकर, तृतीय सुमित काणेकर, वार्ड क्रमांक ५ (कुडाळेश्वरवाडी) प्रथम सत्यवान राऊळ, द्वितीय रोहन काणेकर, तृतीय प्रतीक राऊळ, वार्ड क्रमांक ६ (बाजारपेठ माठेवाडा) प्रथम ओंकार शिरसाट, द्वितीय तेजस पिंगुळकर, तृतीय साईश अंधारी, वार्ड क्रमांक ७ (डॉ. आंबेडकर नगर, भोसलेवाडी, माठेवाडा) प्रथम दाजी कुडाळकर, द्वितीय अक्षय तेंडोलकर, तृतीय रवी कुडाळकर, वार्ड क्रमांक ८ (तुपटवाडी मज्जिद मोहल्ला) प्रथम गोविंद सावंत, द्वितीय सिद्धेश सावंत, तृतीय जितेंद्र सावंत, वार्ड क्रमांक ९ (नाबरवाडी) प्रथम तन्मय कुणकावळेकर, द्वितीय सदानंद कांदे, तृतीय रोहित राऊळ, वार्ड क्रमांक १० (केळबाईवाडी) प्रथम संतोष खटावकर, द्वितीय तेजस पाटकर, तृतीय राज साळुंखे, वार्ड क्रमांक ११ (वाघसावंत टेंब, गणेश नगर) प्रथम प्रतीक सावंत, द्वितीय अप्पू राणे, तृतीय अमेय कुडाळकर, वार्ड क्रमांक १२ (हिंदू कॉलनी) प्रथम गजानन कुडाळकर, द्वितीय बाळा कुडाळकर, तृतीय संजू चिंदरकर, वार्ड क्रमांक १३ (श्रीरामवाडी) प्रथम साई तळवणेकर, द्वितीय विघ्नेश पाटील, तृतीय अंकुश राऊळ, वार्ड क्रमांक १४ (अभिनवनगर, पडतेवाडी) प्रथम स्वरूप पडते, द्वितीय पडते कुटुंबीय, तृतीय हर्षवर्धन जोशी, वार्ड क्रमांक १५ (कुंभारवाडी) प्रथम विशाल कुंभार, द्वितीय आकाश कुंभार, तृतीय धीरज कुंभार, वार्ड क्रमांक १६ (एमआयडीसी, कुंभारवाडी) प्रथम महेश कुंभार, द्वितीय हितेश तिरोडकर, तृतीय विलास पावसकर, वार्ड क्रमांक १७ (सांर्गिडेवाडी) प्रथम डॉ. राजन राणे, द्वितीय चेतन परब, तृतीय ऋषिकेश कांबळी यांनी क्रमांक मिळवले.
संपूर्ण शहरातून प्रथम साई तळवणेकर, द्वितीय सत्यवान राऊळ, तृतीय तुषार आजगावकर उत्तेजनार्थ विघ्नेश पाटील यांनी क्रमांक मिळवले आहे. या स्पर्धेचा लवकरच बक्षीस वितरण कार्यक्रम सिंधुदुर्ग राजाच्या दरबारात होणार आहे अशी माहिती शहर प्रमुख अभी गावडे यांनी दिली आहे.

error: Content is protected !!