स्क्वॅश स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूलची जिल्ह्यात चमक.

कणकवली/मयूर ठाकूर.
क्रीडा संकुल सिंधुदुर्ग नगरी येथे झालेल्या क्रीडा स्पर्धा अंतर्गत नुकत्याच संपन्न झालेल्या स्क्वॅश स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडेच्या विद्यार्थ्यांनी चमक दाखवली आहे. या स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींमधून श्रावणी जाधव (इयत्ता दहावी) हिने 4 था क्रमांक तर 17 वर्षाखालील मुलांमधून कु. विश्वतेज अवताडे( दहावी) यांनी 5 वा क्रमांक प्राप्त केला आहे या दोघांची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.यशस्वी विध्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक श्री.सामंत सर, श्री.दळवी सर,जिष्णा नायर मॅडम, आणि कावले सर यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे,उपाध्यक्ष श्री.मोहन सावंत सर,कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर सर,खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम,सल्लागार डी.पी तानावडे सर,मुख्याध्यापिका सौ.अर्चना देसाई मॅडम,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.





