मंगळसूत्र चोरी प्रकरणी 24 तासात संशयित महिला आरोपीला जेरबंद

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कौतुकास्पद कामगिरी
चोरलेले मंगळसूत्र ठेवले होते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत गहाण
वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये मंगळसूत्र चोरी प्रकरणी गुन्हा दाखल झालेला होता या गुन्ह्यातील संशयित आरोपी अनुपमा सुहास तांडेल,वय 55, रा.राजवाडा ता. वेंगुर्ले स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शितापीने अटक केली संशयीत आरोपीने गुन्ह्यातील चोरी केलेले मंगळसूत्र सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वेंगुर्ले येथील शाखेमध्ये गहाण ठेवले होते पोलिसांनी त्या बँकेत जात सदरचे मंगळसूत्र हस्तगत केले. सदर गुन्हा दाखल झाल्यापासून 24 तासाच्या आत आरोपीला सीतापीने अटक करण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने यश मिळवले असून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या या कामगिरीबद्दल या सर्वच पोलीस व अधिकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे. याबाबतची दाखल फिर्यादीनुसार हकीगत अशी की, 14 ऑगस्ट रोजी वेंगुर्ला पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहीता कलम 305(A), या दाखल गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा वरिष्ठांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्याकडून वेंगुर्ला पोलीस ठाणे हद्दित शोध सुरू होता. यादरम्यान स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा सदर संशयीत आरोपीने केलेला आहे. सदरची माहिती मिळतात पोलिसांनी संशयित आरोपीच्या घराजवळ नियोजनबद्ध सापळा रसून तिला ताब्यात घेत चौकशी केली असता तिने सदरचा गुन्हा आपण केल्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेले मंगळसूत्र सिंधुदुर्ग मध्यवर्ती सहकारी बँक शाखा वेंगुर्ला गहाण ठेवले असल्याची माहिती पोलिसांना दिली.त्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी सिंधुदुर्ग मध्यवर्ती सहकारी बँक शाखा वेंगुर्ला येथे जाऊन चोरीला गेलेले मंगळसूत्र पाहून सदरचे मंगळसूत्र दाखल गुन्ह्यातील असल्याची खातरजमा केली. त्यावरून सदर आरोपी हिला सदर गुन्ह्यात प्रकरणी पुढील तपासासाठी वेंगुर्ले पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. गुन्ह्यातील आरोपीचा गुन्हा दाखल झाल्यापासून 24 तासाच्या आत शोध घेत आरोपीला जेरबंद करण्यात आले. सदरची कारवाई डॉ. श्री. मोहन दहिकर,पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग व मा. कुमारी नयोमी साटम, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग, यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक, प्रविण कोल्हे, यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक श्री. अनिल हाडळ पोलीस हवालदार डाँमनिक डिसोजा, जॅक्सन घोंनसालविस, अमर कांडर सर्व स्थानिक गुन्हे शाखा सिंधुदुर्ग व पोलीस उपनिरीक्षक राठोड , पोलीस कॉन्स्टेबल खडपकर, परुळेकर वेंगुर्ला पोलीस ठाणे यांनी केली आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.





