ब्रह्मकुमारी तर्फे कुडाळ न. पं. मध्ये रक्षाबंधन

नातं जपण्याचा दिला संदेश

कुडाळ : एखादं नातं जन्माचं असलंच पाहिजे असं नाही तर ते मनापासून जपलेलं नातं सुद्धा महत्त्वाचं असतं हाच संदेश देत ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीने कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्यासह मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन केले.
रक्षाबंधनाचे निमित्त साधून ब्रह्मकुमारी समाज संस्थेच्या वतीने कुडाळ नगरपंचायत येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी ब्रह्मकुमारी हर्षा, अंकिता चव्हाण, अजय वालावलकर, कमलाकर बांदेकर यांनी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्यासह मुख्याधिकारी अरविंद नातू तसेच नगरपंचायतीचे कर्मचारी यांना रक्षाबंधन केले. यावेळी त्यांनी ध्यान साधनेचे महत्त्व पटवून दिले यावेळी कुडाळ नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!