जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा आडवली नं. १शाळेत स्त्री पुरुष समानता आधारित रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न

शालेय स्तरापासून स्त्री पुरुष समानता हे मूल्य विद्यार्थ्यांच्या मनात रुजावे या हेतूने आडवली नं. १शाळेतील विद्यार्थ्यांनी परस्परांना राखी बांधून समानता तत्व आयुष्यभर अंगीका रण्याची शपथ घेतली.विशेष म्हणजे आनंदादायी शनिवार अंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या पर्यावरण पूरक आणि जैविक विघटन होणाऱ्या राख्या वापरल्या. त्या बरोबरच वृक्षवल्ली आम्हां सोयरे हे तत्व जपत परिसरातील वृक्षाना राखी बांधत वृक्ष संवर्धनाची प्रतिज्ञा घेत वृक्षाबंधन केले.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापक श्
रामचंद्र कुबल सह शिक्षिका श्रीम. तनुजा तांबे श्रीम. रागिणी ठाकूर आणि श्रीम. वेदिका वाघाटे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या मूल्यवर्धन करणाऱ्या अनोख्या आयोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.




