शिवसेना शिंदे गटाकडून आचरा विभागातील शाळांमध्ये वह्या वाटप

आचरा प्रतिनिधी

शिवसेना शिंदे गटाकडून आचरा जिल्हा परिषद मतदार संघातील जिल्हा परिषद शाळा आणि माध्यमिक शाळांमध्ये वह्या वितरण करण्यात येत असून याचा शुभारंभ चिंदर भटवाडी जिल्हा परिषद शाळा, सडेवाडी जिल्हा परिषद शाळा येथे करण्यात आला. आचरा जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व जि. प. शाळा आणि माध्यमिक शाळांमध्ये वाह्यांचे वितरण करण्यात आले.
यावेळी चिंदर येथील शाळांमध्ये आचरा विभाग प्रमुख संतोष कोदे, भाऊ हडकर, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नाटेकर, राजु वराडकर, मैना कारंडे, दिपा गोसावी, विजय पाटील, शैलेश गोलतकर आदी उपस्थित होते. भटवाडी शाळा मुख्याध्यापक सौ. निशिगंधा वझे, सडेवाडी शाळेच्या शिक्षिका सौ. शुभांगी खोत-लोकरे यांनी मान्यवरांचे स्वागत आणि आभार मानले.

आचरा भागातील प्राथमिक शाळांना शिवसेनेतर्फे वह्यावाटप

आचरा जिल्हा परिषद मतदार संघातील आचरा भागातील प्राथमिक शाळांनाही वह्या वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडीस, अल्पसंख्यांक विभाग प्रमुख मुज्जफर मुजावर, आचरा शाखा प्रमुख अभिजित सावंत, बाबू कदम, सचिन सारंग, श्रीकांत पराडकर, दर्शन तारी उपस्थित होते. आचरा भागातील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप केल्याने पालक वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
फोटो
आचरा विभागात येणाऱ्या सर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिंदेसेनेकडून वह्या वाटप करण्यात आले.

error: Content is protected !!