शिडवणे नं. १ शाळेत ‘राखी बनवा’ कार्यशाळा उत्साहात संपन्न

शिडवणे नं. १ शाळेमध्ये आज, २ ऑगस्ट २०२५ रोजी, आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत कार्यानुभव विषयावर आधारित ‘राखी बनवा’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
या कार्यशाळेला पदवीधर शिक्षिका हेमा वंजारी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थिनींना लोकरीपासून सुंदर आणि आकर्षक राख्या कशा तयार करायच्या याचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यांचे मार्गदर्शन मिळाल्यानंतर शाळेतील बहुसंख्य मुलींनी स्वतःच्या हाताने सुंदर राख्या बनवल्या. लोकरीपासून राखी बनवण्याची प्रक्रिया सोपी असली तरी, मुलींच्या चेहऱ्यावरील आणि डोळ्यांतील आनंद स्पष्टपणे दिसून येत होता.
या कार्यशाळेमध्ये शफा शेख, जोया शेख, तनिष्का पाटणकर, धनश्री सुतार, अनुष्का जाधव, शुभ्रा पांचाळ, फरीन शेख, श्रावणी भोवड, श्रावणी पाष्टे, सबा शेख, वेदिका रांबाडे, मयुरी सुतार, वैष्णवी टक्के आणि साक्षी पाष्टे यांसारख्या अनेक विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला, तसेच राखी पौर्णिमेच्या सणाचे महत्त्वही त्यांना समजले.