विद्यार्थी प्रिय व्यक्तीमत्व परब सर-माजी सभापती निलिमा सावंत

आचरा-अर्जुन बापर्डेकर
न्यू इंग्लिश स्कूल आचराचे मुख्याध्यापक परब सर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी नेहमी झटत होते. ते विद्यार्थी प्रिय व्यक्तीमत्व होते असे मत मालवण पंचायत समिती च्या माजी सभापती आणि स्थानिक स्कूल समिती चेअरमन निलिमा सावंत यांनी न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे व्यक्त केले.
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा चे मुख्याध्यापक गोपाळ परब नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त होत असल्याबद्दल स्थानिक स्कूल समिती आणि शिक्षक वर्गाकडून आयोजित निरोप समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत स्कूल समिती सदस्य राजन पांगे, बाबाजी भिसळे, अर्जुन बापर्डेकर, रघुनाथ पाटील ,अंकुशराव घुटूकडे, मधुरा माणगावकर, प्रकाश महाभोज यांसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित समिती सदस्य, शिक्षक वर्ग यांजकडून परब सरांच्या कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.