“जनमानसातला पोलीस” – मा. श्री.मिलिंद देसाई यांचा “मुख्यमंत्री चषक 2025″कार्यक्रमात गौरव.

कणकवली/मयूर ठाकूर.
कणकवली पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल व सध्या खारेपाटण दूरक्षेत्राचे इन्चार्ज श्री.मिलिंद देसाई यांना नुकताच एक मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.हा सन्मान “भजनी कलाकार संस्था,सिंधुदुर्ग” यांच्या वतीने आयोजित “मुख्यमंत्री चषक २०२५” या भजन स्पर्धेच्या निमित्ताने प्रदान करण्यात आला.
ही स्पर्धा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री,सन्माननीय मा.श्री.देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आली होती.कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री, सन्माननीय नितेशजी राणे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.या गौरव सोहळ्यात,भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग ही संस्था रजिस्टर करण्यामागे मोलाचे सहकार्य करणारे.समाजात पोलिसांची सकारात्मक छबी निर्माण करणारे,सर्वसामान्य नागरिकांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारे,संवेदनशील आणि कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून परिचित श्री.मिलिंद देसाई यांना “जनमानसातला पोलीस” या विशेष उपाधीने सन्मानित करण्यात आले.
त्यांच्या कार्यातील पारदर्शकता, जनतेशी असलेली जवळीक आणि सामाजिक क्षेत्रातील सक्रिय सहभाग यामुळे ते आजही अनेकांच्या मनात विशेष स्थान मिळवून आहेत.
भजनी कलाकार संस्था,सिंधुदुर्ग यांनी अशा प्रकारच्या सामाजिक जाणिवेतून घेतलेल्या उपक्रमामध्ये संस्थाध्यक्ष बुवा श्री.संतोष जी कानडे तसेच सर्व संचालक आणि पदाधिकारी सभासद यांनी दिलेल्या या सन्मानाचा सर्व स्तरावरून गौरव केला जात आहे.





