कलमठ ग्रामपंचायतीत उपसरपंच पदासाठी शिवसेनेचा थेट लढा

भाजपा ला नाराजीचा सामना करावा लागला
ग्रा. पं. सदस्य धीरज मेस्त्री यांची माहिती
कलमठ ग्रामपंचायतीमध्ये 17 पैकी 15 सदस्य संख्येचे भक्कम बहुमत असलेल्या भाजपने उपसरपंचपदासाठी उमेदवार निवडताना काही अंतर्गत नाराजींचा सामना केला. भाजपचे माजी उपसरपंच स्वप्नील चिंदरकर यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या 7 इच्छुकांची नावे शर्यतीत होती. शेवटी पालकमंत्री यांच्या हस्तक्षेपाने दिनेश गोठणकर यांची उमेदवारी जाहीर झाली. मात्र, या निर्णयामुळे काही सदस्यांत नाराजीचे सूर उमटले. असा दावा ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांनी केला. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे, केवळ दोन सदस्य संख्या असतानाही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) च्यावतीने धीरज मेस्त्री आणि सौ. हेलेन कांबळे यांनी बिनविरोध मागे न हटता थेट निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
उपसरपंच पदासाठी पार पडलेल्या निवडणुकीत धीरज मेस्त्री यांचा 2-15 असा पराभव झाला असला, तरी शिवसैनिकांनी दाखवलेली जिद्द, ही लोकांनी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी काही शिवसेना सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असतानाही, आजही कलमठमध्ये उभ्या असलेल्या शिवसैनिकांचे काम स्थानीक लोकांच्या पसंतीस उतरत आहे. आमच्याकडे “संख्याबळ नाही, पण लोकांच्या विश्वासाचे बळ आहे”, असा विश्वास धीरज मेस्त्री यांनी आपल्या भूमिकेतून दाखवून दिला अशी प्रतिक्रिया जनतेमधून उमटत असल्याची माहिती श्री मेस्त्री यांनी दिली.





