‘एक झाड, एक मातेचे मातृत्व’

रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल चे अध्यक्ष ॲड.श्री राजेंद्र रावराणे यांच्या संकल्पनेतून आयोजन
शंकर महादेव विद्यालय कुंभवडे प्रशालेमध्ये मायादेवी विश्राम रावराणे ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने, मायादेवी विश्राम रावराणे यांच्या स्मृतिदिनी, शंकर महादेव सावंत ग्रामविकास संस्थेचे विश्वस्त तथा शंकर महादेव विद्यालय शालेय समिती कार्याध्यक्ष आणि रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल चे अध्यक्ष ॲड.श्री राजेंद्र रावराणे यांच्या संकल्पनेतून प्रशालेत एका विशेष वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. प्रशालेतील २५ विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या मातांना प्रत्येक लागवड केलेल्या झाडाचे ‘मातृत्व’ प्रदान करण्यात आले. या उपक्रमामुळे झाडांच्या संगोपनाची जबाबदारी विद्यार्थी व त्यांच्या मातांवर सोपवण्यात आली असून, पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवण्याचा हा एक स्तुत्य प्रयत्न आहे. सदर उपक्रमांतर्गत सर्व २५ विद्यार्थ्यांमध्ये एक स्पर्धा ठरवून दिली असून येत्या वर्षभरात झाडाची वाढ आणि त्याचे संगोपन या धर्तीवर पुढील वर्षी वनविभागामार्फत सर्व झाडांची पाहणी करून प्रथम येणाऱ्या तीन झाडांना (विद्यार्थ्यांना)ट्रस्टमार्फत बक्षिसे देण्यात येणार आहेत.
यावेळी सर्व मातांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच ट्रस्टतर्फे प्रशालेच्या सर्व विद्यार्थ्यांना तसेच उपस्थित सर्वांसाठी मायादेवी रावराणे ट्रस्ट मार्फत स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
कै. मायादेवी रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शंकर महादेव विद्यालय कुंभवडे शालेय समिती सदस्य निवृत्त गटशिक्षणाधिकारी श्री मोहनराव सावंत साहेब यांचे आई या विषयावर व्याख्यान झाले यावेळी मार्गदर्शन करताना सावंत साहेब यांनी आईला कधी विसरू नका आईला कधी काही कमी करू नका आई हेच आपलं विश्व आहे याची जाण कायम मनात ठेवा आणि तिची सेवा करा असे विद्यार्थ्यांना सांगितले.
तसेच सौ.राजश्री राजेंद्र रावराणे, मेघा गांगण यांनीही विचार मांडले. यावेळी श्री.पृथ्वीराज राजेंद्र रावराणे, सौ.मीरा रावराणे,रोटरी क्लबचे सन्मा. पदाधिकारी आणि सदस्य लीना काळसेकर, अंकिता कर्पे, मोहिनी राठोड,प्रमोद लिमये,अनिल कर्पे ,लवू पिळणकर रवी परब तसेच शाळेच्यामुख्याध्यापिका अपूर्वा सावंत मॅडम, शिक्षक आणि विद्यार्थी, व कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी या हरित उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला आणि यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.





